आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HSBC Holdings Plc Will Shut Its Private Banking Business In India

HSBCचा मोठा निर्णय; भारतातील खासगी बँकींग बिझनेस गुंडाळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'एचएसबीसी'ने भारतातील खासगी बॅंकिंग बिझनेस गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीचे प्रवक्त्यांनी शुक्रवारी मुंबईत ही घोषणा केली. आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात आपली खासगी बँकिंग सेवा बंद करणारी एसएसबीसी ही दुसरी विदेशी बॅंक ठरली आहे. याआधी आरबीएसने भारतातील खासगी बॅंकिंग सेवा बंद करण्‍यासाचा निर्णय घेतला होता.

भारतातील ग्‍लोबल प्रायव्हेट बॅंकिंग ऑपरेशन्स पाहाता एचएसबीसीने हा निर्णय घेतला आहे. एचएसबीसी ग्रुपचा हा एक धोरणात्मक बदल असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था सशक्त आहे. परंतु, भारतीय बाजारात येणारा पैशावर नियंत्रण ठेवण्यात विदेशी बँकांना फारसे यश आलेले दिसत नाही. भारतीय नागरिकांचा विदेशी बॅंकांमध्ये काळा पैसा असल्याचा आरोप होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) याप्रकरणी चौकशी करत आहे. चौकशी सुरु असलेल्या विदेशी बँकांमध्ये एचएसबीसीचा देखील समावेश आहे.