आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hyundai ची Creta लवकर धावेल रस्त्यावर, फ्युडिक स्‍क्‍लप्‍चर डिझाइन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( ह्युदाई कंपनीची नवी एसयुव्‍ही क्रेटा कार )

चेन्‍नई - देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटार इंडीया लिमिटेड कंपनीने नवी एसयुव्‍ही Creta कार तयार केली आहे. ही कार 21 जुलैला देशभरात लॉन्च करण्‍यात येणार आहे. Creta चे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्युंदाईने यात जगभरातील लोकप्रिय ठरलेले 'फ्युडिक स्‍क्‍लप्‍चर 2.0 डिझाईन' वापरले आहे. या सोबतच ह्युंदाई मोटार कंपनी एसयुव्‍ही सेग्मेंटमध्‍ये
पदार्पण करत आहे.
इंजिन आणि ट्रान्‍समिशन
Creta कारमध्‍ये 1.4 लिटर पेट्रोल आणि 1.6 लिटर डिझल इंजिन आहे. विशेष म्हणजे बाजारात पेट्रोल आणि डिझेल अशी दोन्ही सुविधा असलेली कार उपलब्ध आहेत. परंतु या कारच्या इंजिन पेक्षा Creta कारचे इंजिन अधिक शक्तिशाली असल्‍याचा दावा कंपनीने केला आहे.
मजबूत व सुरक्षित बॉडी
Creta कारच्या बॉडीमध्ये आधुनि‍क तंत्रज्ञान वापर करण्‍यात आला आहे. कारच्या डॅश पॅनलची लांबी , फ्लोअर पॅनलवर व्हायब्रेशन पॅड, सेंटल फ्लोअर टनल एरियाच्‍या मजबुतीवर कंपनीने विशेष भर दिला आहे.
नेक्स्ट जनरेशन कार डिझाइन
Creta ही कॉम्पॅक्‍ट एसयूव्‍ही पहिली कार आहे. त्यामुळे हिला नेक्स्‍ट जनरेशन कार असेही म्हटले जात आहे. यात फ्लूडिक डिझाइन (fS 2.0) वापरण्यात आले आहे. तसेच फोर्डच्‍या इकोस्‍पोर्टसारखी डिझाडन तयार करण्‍यात आली आहे.
सिडॉन सेग्मेंट इंजिन
सिडॉन सेग्मेंट कारमध्ये वापरले जाणार इंजिन ह्युंदाईने Creta मध्ये वापरले आहे. याशिवाय या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन व्‍हर्जन बसवण्‍यात आले आहे. कंपनीने कारच्‍या किंमत अद्याप जाहीर केली नाही परंतु, या कारची किंमत 8 ते 12 लाख रूपये राहाण्याची शक्यता आहे.
कारचे डायमेशन
आकर्षक लूक आणि शक्तिशाली इंजिन क्षमता असलेल्‍या कारची लांबी आणि रूंदी ही विशेष बाब आहे.
>लांबी 4270 मिलीमीटर
>रुंदी 1780 मिलीमीटर
>उंची 1630 मिलीमीटर
>व्हीलबेस 2590 मिलीमीटर
कोणाशी होणार स्‍पर्धा
ह्युदाईची Creta कार रॅनोची 'डस्‍टर' आणि निस्सानचर 'टेरानो'शी स्पर्धा करेल, अशी चर्चा आतापासून बाजारात सुरु झाली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ह्युंदाई कंपनीने प्रसिद्ध केलेली Creta Car ची छायाचि‍त्रे...
बातम्या आणखी आहेत...