- अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, सरकारने बॅंकांडून नोटबंदीनंतर अनेक कॅटेगिरीत डिपॉजिट झालेल्या कॅशचा तपशील मागितला होता. तपशील तपासून संबंधित अहवाल प्राप्तीकर विभागाकडे देण्यात आला आहे.
- 3-4 कोटी रुपयांच्या कॅश डिपॉजिटवरील टॅक्स चोरीचा संशय व्यक्त केल जात आहे. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी अहवालाची चौकशी करून डिपॉजिटर्सला नोटिस पाठवण्याच्या तयारीत आहेत.
- नोटबंदीनंतर 60 लाखांहून जास्त बँक अकाऊंट्समध्ये 2 लाख कोटी पेक्षा जास्त कॅश डिपॉजिट करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक करत आहे नोटांची छाननी....
3 डिसेंबरनंतर रिझर्व्ह बँकेने परत आलेल्या नोटांची छाननी करण्यास सुरुवात केली आहे. ही छाननी पूर्ण झाल्यानंतर जमा झालेल्या नोटांची एकूण आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला 500, 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत 86 टक्के चलन देशातील विविध बॅंकांमध्ये परत आले आहे.
पूर्वोत्तर राज्यांमध्ये जमा झाले 10,700 कोटी...
- नोटबंदीनंतर पूर्वोत्तर राज्यांमधील बॅंकांमध्ये 10,700 कोटी पेक्षा जास्त कॅश डिपॉझिट झाली आहे.
कोऑपरेटिव्ह बॅंकांमध्ये जमा झालेल्या 16000 कोटींची चौकशी... समोर किती आला ब्लॅकमनी? वाचा पुढील स्लाइड्सवर क्लिक करून...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)