आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय माल्यांनी कोर्टात खेळली ही नवीन चाल, पाहा काय चालते ओल्या पार्टीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बँकांना ९,४३२ कोटींचा चुना लावून पलायन केलेल्या विजय मल्ल्याने नवीन चाल खेळली आहे. आपणाला भारतात परतायचे आहे, परंतु पासपोर्ट रद्द केल्याने शक्य नसल्याचे त्याने दिल्ली न्यायालयात सांगितले.

मुख्य न्यायदंडाधिकारी सुमीत दास यांच्यासमोर मल्ल्याचे वकील रमेश गुप्ता यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती केली. २६ एप्रिल रोजी एकतर्फी निर्णय घेत मल्ल्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. त्यामुळे इच्छा असूनही भारतात परतणे शक्य नसल्याचे वकिलांनी न्यायालयात म्हटले. यावर उत्तर देण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.
दरम्यान, माल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आहेत. ईडीने तीन समन्स बजावूनही ते मुंबईत ईडीच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाले नाहीत. मल्ल्यांनी तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहण्यासाठी मेपर्यंतची वेळ मागितली होती. पण, जूनच्‍या पहिला पंधरवडा पूर्ण होत आला तरीही माल्‍ल्‍या कोर्टात हजर झाले नाही. त्‍यामुळे र्इडीच्‍या मागणीचा विचार करून विशेष कोर्टाने त्‍यांना फरार घोषित केले. यापूर्वी ईडीच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयाने मल्ल्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट निलंबित केला होता.

माल्यांच्या डोक्यावर आज कर्जाचा 'हिमालय' आहे. मात्र, त्यांच्या लाइफस्टाइलवर याचा किंचितही परिणाम झाल्याचे दिसत नाही. माल्यांचे महगडे शौकही कमी झाले नाही. माल्यांच्या ओल्या पार्टीविषयी तर तुम्हाला माहीत असेलच. माल्यांच्या पार्टीत उद्योजगतासह बॉलिवूडमधील नामी हस्तीही आवर्जुन हजेरी लावत असतात.

माल्या यांनी गेल्या डिसेंबर 2015 ला वाढदिवशी चाहत्यांना गोव्यात आलिशान पार्टी दिली होती. माल्यांनी पार्टीत तूफान खर्च केला होता. पार्टीतील माल्यांचा शाही थाट पाहून तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर रघुराम राजन हे देखील चकीत झाले होते.

पुढील स्लाइडवरील फोटोजमधून पाहा, काय चालते विजय माल्यांच्या ओल्या पार्टीत व कोण-कोण लावतात हजेरी...असे करतात हग आणि किस....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...