आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयडीबीआयची 'स्टँड अप इंडिया' योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयडीबीआय बँकेने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात "स्टँड अप योजना' सादर केली आहे. एससी/एसटी आणि महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी मदत मिळावी हा या मागचा उद्देश आहे. तसेच "रोजगाराच्या शोधात असलेले' त्यांना "रोजगार उपलब्ध करून देणारे' बनवायचे आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्यांना १० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज बँक देणार आहे.

बँकेचे एमडी तथा सीईओ किशाेर खरात यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच एप्रिलला "स्टँड अप इंडिया' योजनेची सुरुवात केली होती. या अंतर्गंत पात्र खातेधारकाला १० लाख ते एक कोटी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निमित्ताने खरात यांचा एक व्हिडिओ मेसेज सर्व क्षेत्रीय कार्यालयात दाखवण्यात आला. या प्रसंगी पात्र लाभार्थीना योजनेच्या दिशानिर्देशानुसार कर्ज मंजुरीचे पत्रही देण्यात आले.

आयडीबीआय बँकेला पंतप्रधान मुद्रा योजना लागू करण्यात मोठे यश मिळाले असल्याचे खरात यांनी सांगितले. या अंतर्गत बँकेने १.६७ लाख लघु उद्योजकांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. तर "स्टँड अप योजना'देखील यशस्वी होईल अशी अपेक्षा खरात यांनी व्यक्त केली.