आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टपासून विमानाचे तिकीट रद्द केल्यास अधिक परतावा मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून तिकीट रद्द करण्यासंदर्भात सुधारित नियम लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार तिकीट रद्द करताना विमान कंपन्यांकडून अतिरिक्त शुल्क लावण्यात येणार नाहीत. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत अधिक रक्कम प्रवाशांना परत मिळू शकेल. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

तिकीट रद्द करताना देशातील अनेक विमान कंपन्या मूळ भाड्यापेक्षा जास्त दंड आणि इंधन अधिभार प्रवाशांवर लादतात; परंतु यापुढे त्यांना असे करता येणार नसल्याचे उड्डाण विभागाच्या महानिदेशकांनी सांगितले. सुधारित नियमानुसार अतिरिक्त दंड लावण्याची मुभा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, तिकीट रद्द करताना विमान कंपन्या पूर्वी युजर डेव्हलपमेंट शुल्क, एअरपोर्ट डेव्हलपमेंट शुल्क, प्रवासी सेवा शुल्क वसूल करत होत्या; परंतु यापुढे याची कपात न करता त्यांना निधी परत द्यावा लागेल. सर्व प्रकारच्या भाड्यांवर हा नियम लागू असणार आहे. विशेष भाडे रद्द करताना पूर्वी मूळ भाडे परत करण्याची मुभा नव्हती; पण आता यात बदल झाला आहे.
या बदलासंदर्भात नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून जून महिन्यात प्रस्ताव मांडण्यात आला होता. अधिकाधिक पारदर्शकता राहावी म्हणून तिकीट रद्द करताना तिकिटावर परत मिळणारी रक्कम आणि लावण्यात आलेला दंड दर्शवण्यात येणार आहे. वेबसाइट आणि विमानतळावरील दर्शनीय भागात यासंबंधीची माहिती लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय तिकिटावरील दुरुस्तीसाठी यापुढे दंड आकारण्यात येणार नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.
...तर परताव्याची जबाबदारी विमान कंपन्यांची
ट्रॅव्हल एजंट किंवा पोर्टलवरून तिकीट बुक करण्यात आले असेल आणि प्रवाशाला ते रद्द करायचे असेल तर रक्कम परत करण्याची जबाबदारी विमान कंपन्यांची असणार आहे. एजंट हे विमान कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यामुळे तिकीट रद्द केल्यानंतर ३० दिवसांत रक्कम परत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही, हे पाहणे विमान कंपन्यांचे काम असल्याचे महानिदेशकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...