आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयास्पद उत्पन्न दिसल्यास कारवाई : प्राप्तिकर विभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली :केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या मोठ्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा लपवण्यासाठी लोक जुन्या कर रिटर्नमध्ये वाढ करतील, अशी शक्यता प्राप्तिकर विभागाला वाटत आहे. रिवाइज्ड रिटर्नमध्ये असे लोक अघोषित संपत्ती लपवण्यासाठी गेल्या वर्षीचे उत्पन्न वाढवून दाखवू शकतात. त्यामुळे नोटाबंदीनंतर रिटर्नमध्ये जास्त बदल करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे.
प्राप्तिकर विभागाचे धोरण निश्चित करणारे मंडळ सीबीडीटीने यासंबंधी माहिती जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी कलम १३९ (५) अंतर्गत रिटर्नमध्ये संशोधनाची सुविधा चुकीची माहिती योग्य करण्यासाठी देण्यात आली आहे.
यामध्ये नजरचुकीने एखादे उत्पन्न दाखवायचे राहिले असल्यास त्यामध्ये जोडण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र, मूळ रिटर्न आणि केलेली दुरुस्ती यामध्ये जास्त अंतर असू नये. जास्त अंतर दिसले तर त्या व्यक्तीची चौकशी होईल. यामध्ये हेराफेरी केल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
जुन्या रिटर्नमध्ये रिव्हिजन केल्यास जास्तीत जास्त ३० टक्के कर आणि सरचार्ज द्यावा लागेल. नवीन गरीब कल्याण योजनेअंतर्गत संपत्ती घोषित केल्यास ५० टक्के कर द्यावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...