आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात-निर्यातीत घट, मंदीमुळे सर्वच वस्तूंची मागणी घटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विदेशात सुरू असलेल्या मंदीमुळे सर्वच वस्तूंची मागणी घटली आहे. याचा सरळ परिणाम भारतीय आयात आणि निर्यातीवर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निर्यातीमध्ये २५.४२ टक्क्यांची घट झाली आहे. यादरम्यान सोन्याची आयात ४५.६२ टक्क्यांनी कमी झाली आहे. असे असले तरी व्यापाराच्या तुटीबाबत देशाला मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात व्यापारातील तूट १९.५० अब्ज डॉलरने कमी झाली आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये १,४४,६५२.६७ कोटी रुपयांची निर्यात झाली ती गेल्या वर्षी याच महिन्यात १,७५,७०३.०३ कोटी रुपये होती.
बातम्या आणखी आहेत...