आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर नियंत्रणासाठी इजिप्तहून 2400 टन कांद्याची आयात; 9000 टन कांदा मुंबईत दाखल होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या नियंत्रणासाठी खासगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून २४०० टन कांद्याची आयात करण्यात आली आहे. यामुळे पुरवठ्यात वाढ होईल. कांद्याचे दर आणखी वाढल्यास आणखी आयात करण्यास मंजुरी दिली जाईल, असे ग्राहक प्रकरणांच्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
 
 
त्यांनी सांगितले, ‘कांद्याच्या किमतीवर आमच्या मंत्रालयाचे बारकाईने लक्ष आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे अाम्ही इजिप्तमधून कांदा आयात करत आहोत. खासगी व्यावसायिकांना २४०० टनांची ऑर्डर दिलेली आहे. कांद्याचे कंटेनर मुंबई बंदरावर उतरवण्याचे काम सुरू आहे. शिवाय ९ हजार टन कांद्याची पुढील अावक लवकरच बंदरावर पोहोचण्याची अपेक्षा आहे.
 
 
व्यावसायिकांशी आढावा बैठक घेतल्यानंतर या अधिकाऱ्याने माहिती दिली. ग्राहक मंत्रालयाचे सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या बैठकीत वाणिज्य आणि कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व व्यावसायिक उपस्थित होते. ते म्हणाले, ‘आयातदारांना येत असलेल्या फ्युमिगेशनसारख्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. कांद्याच्या किमतीत वाढ होण्यामागे साठेबाजांचा हात आहे. राज्यांच्या व्यापाऱ्यांवर मर्यादा  घालण्यास सांगितले आहे. कांदा निर्यातीवर निर्बंध लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. खरिपाच्या नव्या पिकातून मागच्या वर्षीपेक्षा अधिक उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...