आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 Kmph गतीने धावेल भारताची पहिली बुलेट ट्रेन, एवढे असेल भाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा कॉन्ट्रॅक्ट जपानच्या कंपनीला देण्यात आला आहे. मुंबई आणि अहमदाबाद या शहरांना ही ट्रेन जोडणार आहे. त्यानंतर 505 किलोमीटरच्या सात तासांच्या प्रवासासाठी दोन तास लागतील. याबाबत भारत आणि जपान या दोन देशांत करार करण्यात आला आहे.
असा आहे हा प्रोजेक्ट
हायस्पीडः मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर
अंतरः 505 किलोमीटर
खर्च होतीलः 98,805 कोटी रुपये
प्रवासाचा अवधीः 7 तासांऐवजी 2 तास
प्रपोज्ड स्पीडः 300 किलोमीटर प्रति तास
दोन वर्षांपूर्वी केले होते सर्वेक्षण
या प्रोजक्टसाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजंसी (जेआयसीए) आणि भारतातील रेल्वे मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी हायस्पिड ट्रेनसाठी सर्वेक्षण केले होते.
जुलैत सादर करण्यात आला अहवाल
या सर्वेक्षणाचा अहवाल जुलै 2015 मध्ये भारत सरकारला सोपविण्यात आला. यात सुचविण्यात आले होते, की जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये असलेल्या शिंकान्सेनच्या आधारावर भारतात बुलेट ट्रेन चालविली जाऊ शकते.
एवढे असेल भाडे
जेआयसीएच्या सर्वोक्षणावर बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या बुलेट ट्रेनचे भाडे सुमारे 2800 रुपये असू शकते. मुंबई-अहमदाबाद या दोन शहरांमध्ये सर्वाधिक भाडे मुंबई शताब्दी एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लासचे आहे. सध्या हे भाडे 1920 रुपये आहे..
पुढील स्लाईडवर वाचा, रेल्वे रुटमध्ये किती असतील पुले, बोगदे... जपानमध्ये कधी सुरु करण्यात आली होती बुलेट ट्रेन... कधी धावेल पहिली बुलेट ट्रेन....इत्यादी फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...