आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो : या स्टोअरमध्ये किराणा सामानासोबत घरही खरेदी करता येईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- हे छायाचित्र टोकियोमध्ये सुरू करण्यात आलेल्या किराणा दुकानाचे असून येथे ग्राहकांना छोटे घरदेखील खरेदी करता येणार आहे. ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येथे डिझायनरदेखील उपस्थित राहतील. पहिले छायाचित्र लाकडापासून बनलेल्या छोट्याशा घराचे आहे. दुसऱ्या छायाचित्रात घरातील संगीत खोली दिसत आहे. या दुकानात घरासाठी महत्त्वाचा किराणा, भाज्या, कपडे आणि खाद्यान्नदेखील मिळेल. फळे आणि भाज्या उपलब्ध असतील, असे हे मूजी कंपनीचे जगातील पहिलेच स्टोअर आहे.  

शुद्ध उत्पादने 
या स्टोअरमधील सर्व उत्पादने रसायने आणि खतेमुक्त असल्याचा दावा मूजीने केला आहे. ही उत्पादने सरळ उत्पादकांकडून खरेदी केली जातात. त्यामुळे ग्राहकांना शुद्ध वस्तूच मिळतात. 

शहरात आरामदायी आयुष्य देईल ‘हट’  
शहरातील धकाधकीच्या जीवनात आराम मिळण्यासाठीच ‘टिनी हट’ बनवण्यात आले आहेत. मूजी सध्या कल्पनेला उत्पादन बनवण्यावर काम करत आहे. पहिल्याच मजल्यावर ठेवलेल्या या ‘हट’ला पाहून घर कसे हवे, याचा निर्णय ग्राहक घेऊ शकतील.
बातम्या आणखी आहेत...