आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत व्हायचंय..? मग, आत्मसात करा झटपट श्रीमंंत होण्याची ही नऊ सुत्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आपण खूप श्रीमंत व्हावे, अशी एक सुप्त इच्छा प्रत्येक व्यक्तिच्या मनात असते. काही मंडळी ही इच्छा बोलून दाखवतात तर काही ती मनातच दाबून ठेवतात. श्रीमंतीचे नेमके सुत्र काय? हे एक कोडे आहे. खरं तर पैसा मिळविणे हे एक शास्त्र आहे आणि पैसा टिकवून ठेवणे, वाढवणे ही एक कला आहे.

काही मंडळी जगातील अब्जाधीशांकडे पाहून श्रीमंत होण्याचे स्वप्ने पाहातात. मात्र, अब्जाधीश काय विचार करतात. स्वत:च्या प्रगतीसाठी कुठली उपाययोजना करतात, हे पाहाणे तितकेच महत्त्वाचे असते. प्रत्येक दिवशी विचार करण्याची पद्धत ही अब्जाधीशांना इतरांपेक्षा वेगळे ठेवत असते, असे ‘रि‍च हॅबि‍ट: द डेली सक्‍सेस ऑफ वेल्‍थी इंडि‍व्हिजि‍अल’ या पुस्तकाचे लेखक थॉमक कोरले यांनी सांगितले आहे.

कोरले यांनी अब्जाधीश व्‍यक्ती (16 लाख डॉलरपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न) व मध्यम वर्गीय व्यक्ती (35 हजार डॉलरपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न) दोघांच्या जीवनशैलीवर सलग पाच वर्षे अभ्यास केला. अब्जाधीश व सामान्य व्यक्तींच्या विचार करण्याच्या पद्धतीमधील फरक दिसून येतो. कोरले यांनी हाच फरक ‘रि‍च हॅबि‍ट’ व ‘पॉवर्टी हॅबि‍ट’ नामक दोन सेग्मेंट मांडला आहे.

अब्जाधीशांवर त्यांचा सवयींचा जास्त प्रभाव असतो?
श्रीमंत व्‍यक्ती नेहमी आपल्या लक्ष्‍यावर केंद्रीत असतात.
‘मी माझ्या लक्ष्‍यावर प्रत्येक दिवशी फोकस करत असतो'
62 टक्के श्रीमंतांनी मान्य केले
6 टक्के गरीबांनी मान्य केले
पुढील स्‍लाइडवर वाचा, श्रीमंत व्यक्ती दररोज बनवतात कामाची यादी...
बातम्या आणखी आहेत...