आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशचा ट्रक सामानासह दिल्लीत दाखल; नव्या इतिहासाची नांदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत तसेच भारताच्या तीन शेजारील देशांमध्ये सहजतेने देवाण-घेवाण व्हावी यासाठी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार बांगलादेशातून सामानाने भरलेला ट्रक पहिल्यांदाच दिल्लीमध्ये पोहोचला आहे. यासोबतच नव्या इतिहासाची सुरुवात झाली आहे.

जागतिक पातळीवर किरकोळ विक्री करणारी कंपनी मार्क्स अँड स्पेन्सरसाठी तयार करण्यात आलेले सामान घेऊन हा ट्रक दिल्लीमध्ये पोहोचला आहे. नरजूल ट्रान्सपोर्ट संस्थेचा हा ट्रक २७ ऑगस्ट रोजी ढाकामधून निघाला होता. या ट्रायलरनसाठी या ट्रकला परवानगी देण्यात आली होती. केंद्र सरकारच्या वतीने बांगलादेश, नेपाळ, भूतान तसेच भारत यांच्या दरम्यान मेगा मार्केट तयार करण्यासाठी विशेष करार करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने वेळ आणि गुंतवणूक दोन्हींची बचत होणार आहे. या कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणीच या ट्रकमुळे झाली आहे. ट्रकच्या माध्यमातून सामान सहज देशात आल्यास यामुळे खर्चात २० टक्के बचत होणार असून वेळेतही दिवसांची घट होणार असल्याचे मार्क्स अँड स्पेन्सर कंपनीच्या भारतातील व्यवस्थापक निधी दुआ यांनी सांगितले. या आधी बांगलादेशातून येणाऱ्या सामानाला सीमेवर बांगलादेशातील ट्रकमधून काढून पुन्हा भारताच्या ट्रकमध्ये चढवावे लागत होते. यामध्ये वेळ आणि सामानाचेही नुकसान होत होते. तसेच सामानासाठी ट्रक बदलत असताना चोरी तसेच हवामानाचाही विपरीत परिणाम होत होता. ट्रकमध्ये लावण्यात आलेल्या चिपमुळे कस्टम फ्री सीमेच्या माध्यमातून ट्रकवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या प्रकारच्या सर्व घडामोडींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाऊ शकते.

या मार्गाने आला ट्रक
ढाकावरून निघालेला हा ट्रक प. बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशातून दिल्लीला पोहोचला आहे. काका ते दिल्लीदरम्यान या ट्रकने १,८५० किलोमीटरचे अंतर पार केले.
बातम्या आणखी आहेत...