आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडिया-चायना गुंतवणूकदार परिषद : १५ वर्षांत होईल १० लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुढील १५ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था चीनप्रमाणेच १० लाख कोटी डॉलरची होण्याची शक्यता असल्याचे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी व्यक्त केले आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था दोन लाख कोटी डॉलरची आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या वतीने आयोजित इंडिया-चायना गुंतवणूकदार परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

चीनच्या तुलनेत भारताचा विकास तेजीने होत असून गेल्या १५ वर्षांत चीनचा ज्या प्रमाणात विकास झाला, त्या प्रमाणात विकास करण्याची क्षमता भारतात असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताला सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊसमध्ये विकसित करण्यासाठी नीती आयोग पुढील १५ वर्षांची ब्लूप्रिंट बनवत आहे. ही ब्लूप्रिंट रोडमॅप म्हणून काम करेल. भारताला १० लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी पुढील १५ वर्षांत १० टक्के विकास दर कायम ठेवावा लागणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी भारताकडे आवश्यक असलेली क्षमता उपलब्ध असल्याचेही पनगढिया यांनी सांगितले. गेल्या १५ वर्षांत चीनची अर्थव्यवस्था दोन लाख कोटी डॉलरवरून १० लाख कोटी डॉलरपर्यंत पोहाेचली असल्याचेही ते म्हणाले.

चीनच्या अनुभवाचा फायदा
उत्पादन क्षेत्र आणि देशाला मॉडर्न अर्बन अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्यासाठी चीनच्या अनुभवाचा भारताला फायदा होऊ शकतो, असे मत पनगढिया यांनी व्यक्त केले. जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेत मंदी असली तरी भारत आणि चीनवर जगाचे लक्ष असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...