आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Fastest Growing Nation, But Also Among The Poorest: Rajan

तेज विकासामुळे उत्साह नको, भारत अजूनही सर्वात गरीब देशांत : राजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारतीय आर्थिक विकास दर तेजीने सुधारत असला तरी आपल्याला जास्त उत्साहित होण्याची आवश्यकता नाही. आपण कमीत कमी २० वर्षांपर्यंत तेजीने विकास केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकाचे जीवनमान सुधारण्याची शक्यता असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. बुधवारी राष्ट्रीय बँक प्रशिक्षण संस्थेच्या (एनआयबीएम) दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेपेक्षा फक्त ७० टक्के उत्पादन होत आहे. खराब मान्सूनमध्ये कृषी विकास दरात मंदी कायम आहे. असे असले तरी जगभरातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था तेजीने विकास करत आहे. त्यामुळे आपली विकासाची शक्यतादेखील जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिव्यक्ती सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) हा विकास माेजण्याचे महत्त्वाचे एकक अाहे. प्रतिव्यक्ती जीडीपीच्या आधारावर आपण जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्षमतेपेक्षा खराब प्रदर्शन करणारा देश म्हणून आपली प्रतिमा खराब झाली आहे. यामुळे प्रतिव्यक्ती जीडीपीच्या आधारावर आपण ब्रिक्स देशांमध्ये सर्वात गरीब आहोत. आपल्याला या स्थितीत बदल करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत सर्वात तेजीने विकास करणारा देश ठरत असला तरी प्रमुख बँकेचा गव्हर्नर या नात्याने मी अतिउत्साहित होऊ शकत नाही. सध्याच्या स्थितीत आपला विकास दर म्हणजे सरकार आणि देशातील लोकांच्या मेहनतीचे फळ आहे. मात्र, प्रत्येक भारतीयाला चागले जीवनमान देण्यासाठी आपल्याला सलग २० वर्ष असाच विकास दर ठेवावा लागणार आहे. अापण आजपर्यंत केलेल्या प्रगतीला छोटे दाखवण्याचा माझा हेतू नाही. केंद्र सरकार मजबूत आणि स्थायी विकासासाठी पाया तयार करत आहे. या सर्वांचे फळ आपल्याला नक्की मिळेल याचाही विश्वास असल्याचे राजन यांनी या वेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
चिनी चारपट श्रीमंत
आपल्या देशाची तुलना कायम चीनसोबत केली जाते. चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार १९६० च्या दशकात भारतापेक्षा लहान होता. मात्र, आज तेथील अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा पाच पट मोठी आहे. सरासरी चिनी व्यक्ती भारतीय व्यक्तीपेक्षा चार पट श्रीमंत असल्याचे राजन यांनी सांगितले.