आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनपेक्षा भारताचा जीडीपी दर चांगला राहील : फिच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोठ्या नोटा बंद केल्यामुळे अलीकडच्या काळात भारताच्या जीडीपीवर त्याचा नकारात्मक परिणाम होणार असल्याचे मत गुणांकन संस्था फिचने व्यक्त केले आहे. असे असले तरी चालू आर्थिक वर्षातील सर्व तिमाहींचा विचार केल्यास याची स्थिती सुधारण्याची शक्यता असल्याचे मतही संस्थेने नोंदवले आहे. मध्यावधीत भारताचा जीडीपी विकास दर चीनपेक्षा जास्त राहणार असल्याचे मतही संस्थेने व्यक्त केले आहे. पुढील आर्थिक वर्षात सुधारणा आणि चलन धोरण सकारात्मक राहिल्यामुळे विकास दरात वाढ होण्याची अपेक्षाही संस्थेने व्यक्त केली आहे.
नोटाबंदीमुळे अलीकडच्या काळात जीडीपीवर नकारात्मक परिणाम होईल, तर जास्त कालावधीचा विचार केल्यास नगदीची कमतरता किती दिवस राहील यावर सर्व अवलंबून असल्याचे मत संस्थेने मांडले. चालू तिमाहीमध्ये जीडीपीत घट अपेक्षितच असल्याचे मत फिचचे आशिया-पॅसिफिक सॉव्हरेन्स समूहाचे संचालक थॉमस रुकमाकर यांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...