आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजदर कपातीत आता महागाई ठरणार अडसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशाच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अन्नधान्याच्या महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ही महागाई रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीमध्ये अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी जाहीर होणार्‍या नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. परंतु किमती थोड्या प्रमाणात नियंत्रणात आल्या तर रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदर कमी होण्याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

या अगोदर रिझर्व्ह बँकेने १५ जानेवारीला व्याजदरात पाव टक्क्याने कपात केली होती. त्यानंतर चार मार्चला तेवढीच कपात करून व्याजदर साडेसात टक्क्यांवर आणला. कमी झालेली महागाई आणि केंद्र सरकारने आर्थिक सर्वसमावेशकता कार्यक्रमावर दिलेला भर लक्षात घेऊन त्या वेळी मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपात केली होती. परंतु आता मात्र वाढत्या महागाईमुळे पुन्हा व्याजदर कपातीला खो बसण्याची शक्यता आहे.

शेतपिकांचे २५ ते ३० टक्के नुकसान
अवकाळी झालेल्या पावसाचा गहू, तेलबिया, डाळीसारख्या महत्त्वाच्या रब्बी िपकांवर परिणाम झाला आहे. जवळपास २५ ते ३० टक्के शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याचे असाेचेमने म्हटले आहे.

- बँकांना कर्जदर कमी करता यावेत यादृष्टीने रिझर्व्ह बँक रोख राखीव प्रमाण कमी करेल, अशी शक्यता वाटते. परंतु रेपो दर कमी झाल्यास सध्याच्या परिस्थितीत त्याचा बँकांना फायदा होणार नाही. कारण चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्ज उचलण्याचे प्रमाण कमी आहे. - टी. एम. भसीन, अध्यक्ष, इंडियन बँक्स असोसिएशन
बातम्या आणखी आहेत...