आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Post To Get Corporate Makeover With Employment Of Lakhs Of Individuals

भारतीय पोस्‍ट ऑफिसचा कार्पोरेट लुक, चार लाख नोकरीच्‍या संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भारतीय पोस्‍ट ऑफिसचा आधुनिक  कार्पोरेट लुक) - Divya Marathi
(भारतीय पोस्‍ट ऑफिसचा आधुनिक कार्पोरेट लुक)
(भारतीय पोस्‍ट ऑफिसचा आधुनिक कार्पोरेट लुक)
नवी दिल्‍ली- भारतीय पोस्‍ट ऑफिसचा जाळ देशभर पसरलेला आहे. पोस्‍ट ऑफिसच्‍या डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (डॉट) विभाग देशभर पसरलेला जाळ एकत्र जोडत आहे. त्‍यासाठी बँकींग आणि ई-कॉमर्सची सेवा सुरू करण्‍याच्‍या तयारीत आहे. या निर्णयाने भारतीय पोस्‍ट ऑफीसमध्‍ये चार लाख नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध्‍ा होणार आहे. या योजनेची अमलबजावणी तीन वर्षात पुर्ण होणार आहे. यामुळे शहरी व ग्रामिण भागातील उद्योग व्‍यवसायाला फायदा होणार आहे.
तीन वर्षात लाखो नोकरीच्‍या संधी
भारतीय पोस्‍ट ऑफिसच्‍या टेलीकॉम विभागाच्‍या एका वरीष्‍ठ अधिका्-याने सांगितले की, गावागावात भारतीय पोस्‍ट ऑफिसचा नेटवर्क 1.5 लाखापेक्षा अधिक पसरलेला आहे. पोस्‍ट ऑफिस जाळ एक प्रकारे नविन उद्योगात वाढ करण्‍यासाठी पोषक आहे. ही वाढ सुब्रमण्‍यम कमिटीच्‍या शिफारसीच्‍या आधारावर होत आहे. यासाठी RBI भारतीय पोस्‍ट ऑफिसला 'पेमेंट बँक' लायसंन्‍स देत आहे. यामुळे पोस्‍ट ऑफिस ई-कॉमर्स बिझनेसमध्‍ये रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होणार आहे. पुढील 4 ते 5 वर्षात भारतीय पोस्‍ट ऑफिसांतर्गत 3 ते 4 लाख नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध होणार असल्‍यासचे वरिष्‍ठ अधिका-यांनी सांगितले.
पोस्‍टमनला देणार सोलर डिवाईस
येणा-या काळात पोस्‍टमनची भुमिका खुप बदलणार आहे. सरकारने पोस्‍टमनला सोलर डिवाईस देण्‍याची तयारी दर्शवली आहे. त्‍यामुळे मनी ट्रांजेक्‍शन सोप होईल. याचा लाभ बॅंकींग सेवा व ई-कॉमर्स सेवांसाठी होणार आहे.
चार कंपण्‍यात विभाजनाची योजना
वरिष्‍ठ अधिका-यांच्‍या माहितीनुसार भारतीय पोस्‍ट ऑफिस इन्‍सुरंस सोबत उत्‍पादन विकण्‍याचेही काम करतात तसेच ई-कॉमर्स कंपनीसाठी उत्‍पादन सप्‍लायचेही काम करते. यासाठी एक होल्डिंग कंपनी, बँकिंग आणि फायनंन्‍स सेवांसाठी एक सब्सिडियर कंपनी, तसेच 100 करोड रूपये निधीची इन्‍सुरंस कंपनीचा प्रस्‍ताव आहे.
ई-कॉमर्ससाठी पीएसयु तयार करण्‍याचा प्रस्‍ताव
पोस्‍ट ऑफिस जे पार्सलचे काम करते, त्‍यासाठी एक सार्वजनिक उपक्रम आराखडा तयार करण्‍यात येत आहे. ते ई-कॉमर्स गतविधीसाठी कामकरणार असुन ई-कॉमर्स कंपन्‍यांनाही सोबत जोडू शकते.
बिल पेमेंट व युटीलिटी सेवांसाठी कंपनी
चौथी कंपनी सार्वजनिक सेवा देण्‍याची काम करणार आहे. जे की बिल कलेक्शन, पेमेंट गतविधी सोबत प्रमाणपत्र देने, आवेदन पत्र देने आदी सेवा देण्‍याचे काम करणार आहे. यासोबतच एकुण 300 सेवा यामध्‍ये जोडण्‍याचे प्रस्‍ताव असल्‍याचे एका वरिष्‍ठ अधिका-यांनी सांगितले आहे