आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची आयात दुपटीने वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असले तरी सोन्याच्या आयातीत वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या वर्षी मे महिन्यात सोन्याची आयात ६९.२ टन झाली आहे, ती गेल्या वर्षी मे महिन्यात ५२.६ टन होती. अर्थमंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने ही माहिती दिली आहे.

एप्रिल महिन्यात सोन्याची एकूण आयात ८६.७ टन झाली होती. या तुलनेत मे महिन्यात सोन्याच्या आयातीत घट झाली आहे. अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात सोन्याच्या आयातीत १०.८ टक्के किंवा २४ लाख डॉलरची वाढ दिसून आली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सोन्याची आयात ४३.२ टन झाली होती. या वर्षी त्यात दुप्पट वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात लग्नसराई असल्यामुळे देशात सोन्याची मागणी वाढते. त्यासोबतच अक्षय्य तृतीयेलादेखील सोन्याला मागणी असते.

त्यामुळे सोन्याची आयात वाढली असल्याचे सांगण्यात येते. देशात वर्षभरात ८०० ते १००० टन सोन्याची आयात केली जाते. भारतात कच्च्या तेलानंतर सर्वात जास्त सोन्याची आयात केली जाते.
बातम्या आणखी आहेत...