आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत व्यवसाय अन् अर्थव्यवस्थेच्या 16 निर्देशांकांपैकी 10 मध्ये भारताची क्रमवारी घसरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभतेच्या (इझ ऑफ डुइंग बिझनेस) क्रमवारीत भारत ३० क्रमांकांनी वर आला असला तरी व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक निर्देशांकांत अजूनही खूप मागे आहे. १६ प्रमुख निर्देशांकांत तीन वर्षांची तुलना केली तर केवळ तीनमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. चारमध्ये थोडी, तर ९ निर्देशांकांत घसरण झाली आहे. अनेक निर्देशांकांत सुधारणा झाली असली तरी क्रमवारी कमीच आहे. म्हणजेच मानवी विकासामध्ये १८८ देशांत १३१ व्या, आर्थिक स्वातंत्र्यामध्ये १८६ देशांत १४३, उपासमारीत ११९ देशांत १०० व्या क्रमांकावर आहे. इझ ऑफ डुइंगव्यतिरिक्त केवळ चार निर्देशांकांत स्थिती उत्तम आहे. यात एफडीआय कॉन्फिडन्स, ग्लोबल कंपिटिटिव्हनेस, ग्लोबल ह्युमन कॅपिटल आणि ग्लोबल इनोव्हेशन निर्देशांकाचा समावेश आहे.
 
पुढील स्‍लाईडवर पहा, ९ निर्देशांकांत भारताची क्रमवारी जगात १०० च्या खाली, अार्थिक स्वातंत्र्यात सर्वात खराब ...
 
बातम्या आणखी आहेत...