आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा विकास दर ७.६ टक्के राहणार : वर्ल्ड बँक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक संस्थांपैकी वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) यांचा भारतीय अर्थ व्यवस्थेवरील विश्वास कायम आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना किंवा चीनमधील मंदीचा विचार केल्यानंतरही भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षात ७.६ टक्के राहण्याचा अंदाज या दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

पुढील वर्षी भारताचा ७.७ टक्के विकास दर राहील, असे मत आयएमएफने व्यक्त केले आहे. वर वर्ल्ड बँकेने पुढील वर्षी ७.६ टक्के विकास दर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वर्ष २०१५ मध्ये भारताचा विकास दर ७.६ टक्के तर चीनचा ६.९ टक्के होता. वर्ल्ड बँकेने आपल्या अहवालात भारतासमोरील आव्हानांचाही उल्लेख केला आहे. यामध्ये विकासासोबत गरिबी घट, सर्वसमावेशी विकासाला चालना, आरोग्य, पोषण, शिक्षणातील सुधारणा तसेच महिला-पुरुषांमध्ये असलेल्या असमानतेचा सामना करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर भारताची अर्थव्यवस्था मजबुतीसह पटरीवर येत असल्याचे मत आयएमएफने जाहीर केलेल्या अर्थव्यवस्थेविषयक अहवालात व्यक्त केले आहे. भारतात व्यापार आणि धोरणात्मक उपाययोजनांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या असल्याचेही आयएफएफने अहवालात नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...