आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनला मागे टाकून भारत बनणार जगातील 5वी मोठी अर्थव्‍यस्‍था, आयएमएफचा अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- भारत लवकरच ब्रिटनला मागे टाकून जगातील टॉप 5 अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये समाविष्‍ट होणार आहे. तसेच 2022 पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्‍यवस्‍था बनेल, असा अंदाज आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे.
 
आयएमएफने जीडीपीच्‍या आधारावर देशांची रँकिग बनवली आहे. यानुसार भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा सध्‍याचा वार्षिक विकासदर 9.9% आहे. मात्र येत्‍या काळात भारताच्‍या विकासदाराचा वेग वाढणार असून 2022 पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकेल, असे आयएमएफने म्‍हटले आहे. सध्‍या भारत जगातील सातवी सर्वात मोठी अर्थव्‍यवस्‍था आहे.

भारतीय अर्थव्‍यस्‍थेसमोरील आव्‍हाने
- मागील वर्षी घेण्‍यात आलेल्‍या नोटबंदीच्‍या निर्णयामुळे देशातील तब्‍बल 86 टक्‍के चलन रद्द झाले. यातून देश अद्यापही पूर्णपणे सावरलेला नाही, असे आयएमएफने म्‍हटले आहे.
- पायाभूत सोयी-सुविधांसह रोजगार निर्मितीचा अभाव, शाश्‍वत विकासाच्‍या योजना, घटलेले उत्‍पादन, कररचना ही भारतीय अर्थव्‍यवस्‍थेसमोरील मोठी आव्‍हाने आहेत, असे आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीने म्‍हटले आहे.
 
भारतीय बँकांची चिंताजनक स्थिती
- मोठ्या भांडवलदारांची थकीत कर्जे, बुडीत कर्जे,  कर्जमाफी अशा मुद्दयांमुळे भारतीय बँकां डबघाईला आल्‍या असून त्‍याची स्थिती चिंताजनक असल्‍याचे आयएमएफने म्‍हटले आहे.
- बुडीत कर्जाचे प्रमाण वाढल्‍याने बॅंकांनी सध्‍या कर्जवसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन कर्जे देण्‍यास बँका तयार नाहीत. याचा गुंतवणकीवर विपरीत परिणाम होत आहे, असे आयएमएफच्‍या अहवालात म्‍हटले आहे.
- गुंतवणुक क्षेत्रावर परिणाम झाल्‍याने रोजगार निर्मितीचे प्रमाणही कमी झाले आहे. हे भारतीय अर्थव्‍यस्‍थेसमोर मोठे आव्‍हान असल्‍याचे आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीने म्‍हटले आहे.  

जीएसटीच्‍या फायद्याबाबत साशंकता
- भारताने जीएसटी कायद्याच्‍या अमंलबजावणीबाबतीत उशीर केला, असे आयएमएफने म्‍हटले आहे.
- 1 एप्रिलपासून जीएसटी लागू करण्‍यात येणार होती. मात्र सरकारला कालमर्यादा पाळता आली नाही. आता देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू होण्‍याची शक्‍यता आहे.
- तरीदेखील वस्‍तू आणि सेवा कर कायदा भारतीय अर्थव्‍यवस्‍थेसाठी किती फायदेशीर ठरेल, याबाबत साशंकता असल्‍याचे आयएमएफने म्‍हटले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...