आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India To Become $10 Trillion Economy By 2032: Amitabh Kant

२०३२ पर्यंत देशातील कोणीही गरीब राहणार नाही, नीती आयोगाच्या सीईओंचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - २०३२ पर्यंत आपल्या देशात कोणीही गरीब राहणार नसल्याचा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी केला आहे. तसेच १० टक्के िवकासदरासह भारताची अर्थव्यवस्था १० लाख कोटी डॉलरची (६६५ कोटी रुपये) होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या आपली अर्थव्यवस्था सुमारे दोन लाख कोटी डॉलरची आहे. या दरम्यान १७ कोटी ५० हजार अतिरिक्त रोजगारांच्या संधीदेखील तयार होतील.

दिल्लीमधील विज्ञान भवनमध्ये लोकसेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सादरीकरण करताना त्यांनी सांगितले की, देशाचा सध्याचा जीडीपी विकासदर सात टक्के जरी कायम राहिला तरी १६ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था सहा लाख कोटी डॉलरवर पोहाेचेल. अशा वेळी पाच ते सहा टक्के लोकसंख्या गरिबी रेषेच्या खाली राहील. २०१५-१६ मध्ये देशाचा जीडीपी विकासदर ७.६ टक्के होता.

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये रस्ते आणि रेल्वेमध्ये दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कांत यांनी सांगितले. वर्षभरात १०,००० किलोमीटरचे रस्ते बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच या वर्षभरात देशभरातील सर्व रोजगार कार्यालये ई-प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जोडली जाणार असल्याचेही ते म्हणाले.