आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत बनेल स्मार्टफोन उत्पादन हब : अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत सध्या जगातील सर्वात तेजीने वाढत असलेला बाजार असून येत्या काळात भारत स्मार्टफोन उत्पादनाचा हबदेखील बनू शकतो. असे असले तरी भारतात विक्री होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये भारतात तयार होणारे किंवा असेंबल होणाऱ्या फोनची विक्री फक्त ६ टक्के आहे. मात्र, पुढील पाच वर्षांत ही संख्या वाढून ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा काउंटर पॉइंट रिसर्च आणि आयआयएम- बंगळुरूच्या संयुक्त अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. मोबाइल फोन वापरण्यामध्ये यावर्षी भारत अमेरिकेला मागे टाकत स्मार्टफोन बाजारात जगातील दुसरा मोठा देश बनला असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत भारतातील स्मार्टफोनची विक्री १०० कोटींचाही अाकडा पार करण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार चीन आणि दक्षिण कोरियासारख्या देशात स्मार्टफोनमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर क्रमश: ७० आणि ५० टक्के होतो, तर भारतात फक्त ६ टक्के स्वदेशी वस्तूंचा वापर हाेतो. मात्र, सध्या अमेरिका, चीन आणि इतर देशांच्या बाजारात मंदी आहे. त्यामुळे अॅपल, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि श्याओमीसारख्या कंपन्या भारतात प्रकल्प सुरू करण्याची तयारी दाखवत आहेत. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक याच वर्षी मे महिन्यात पहिल्यांदाच भारता दौऱ्यावर आले होते. भारतात स्टोअर सुरू करण्याची अॅपलची इच्छा आहे. मात्र, सध्या तयार करण्यात आलेल्या नियमानुसार कोणत्याही कंपनीला सिंगल ब्रँड रिटेल स्टोअर सुरू करायचे असल्यास, त्यांना ३० टक्के कंपोनंट स्वदेशी खरेदी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...