आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Indian Assets Declined From A Year Ago, In 2015, Was Rs 221 Lakh Crore, Now 210 Trillion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लोबल वेल्थ रिपोर्ट : एका वर्षात भारतीयांच्या मालमत्तेत घट, २०१५ मध्ये २२१ लाख कोटी रुपये होती, आता २१० लाख कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीयांच्या मालमत्तेमध्ये वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ०.८ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. २०१५ मध्ये भारतीयांची एकूण मालमत्ता ३,२५० अब्ज डॉलर (१.७७ लाख कोटी रुपये) होती. आता यात २६ अब्ज डॉलरची घट (१.७७ लाख कोटी रुपये) होऊन ती ३,०९९ अब्ज डाॅलर (२१० लाख कोटी रु.) राहिली आहे. जागतिक पातळीवर आर्थिक सेवा देणारी कंपनी क्रेडिट सुइसने २०१६ च्या ‘ग्लोबल वेल्थ रिपोर्ट’ मध्ये ही माहिती दिली आहे. रुपयाची किंमत कमी झाल्यामुळेच भारतीयांच्या मालमत्तेत घट नोंदवण्यात आली असल्याचे मतही या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
या अहवालानुसार भारतातील मालमत्तेची विभागणी खूपच असमान आहे. येथील ९६ टक्के लोकांकडे १०,००० डॉलर (६.८ लाख रु.) पेक्षा कमी मालमत्ता आहे, तर फक्त ०.३ टक्के लोक असे आहेत, ज्यांच्याकडे एक लाख डॉलर (६८ लाख रु.) पेक्षा जास्त मालमत्ता आहे. एक लाख डॉलरपेक्षा जास्त मालमत्ता असणाऱ्यांची संख्या २.४८ लाख आहे.
}३.४ लाख रु. होती २०१० मध्ये प्रति व्यक्ती मालमत्ता
}२.६ लाख रु. राहिली २०१६ मध्ये ही २५ टक्क्यांनी कमी होऊन
}२,२६० लोकांकडे ३४० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता
} १,०४० लोकांकडे ६८० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता
भारतीयांची ८६ % मालमत्ता स्थावर आहे. मालमत्तेच्या तुलनेत कुटुंबीयांवरील कर्जाचे प्रमाण विकसित देशांपेक्षाही कमी
सध्या जगात भारत १४ व्या क्रमांकावर असून पुढील पाच वर्षांत स्वित्झर्लंड व तैवानला मागे टाकून १२ व्या क्रमांकावर जाऊ शकतो.
जगात १.४ % वाढ
जागतिक पातळीवर मालमत्तेत १.४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. जगभरातील सर्व देशांची एकूण मालमत्ता २५६ लाख कोटी डॉलर (१७,४०० लाख कोटी रु.) आहे. हा आकडा अमेरिकेच्या जीडीपीपेक्षा १४ पट, तर भारताच्या जीडीपीपेक्षा १२५ पट जास्त आहे. प्रति व्यक्ती वेल्थ गेल्या वर्षीच्या बरोबरीत ५२,८०० डॉलर म्हणजेच ३५.९ लाख कोटी रुपये आहे.
चलन स्वस्त केल्याने चीनला तोटा
चलनाचे दर कमी केल्यामुळे चीनचेदेखील नुकसान झाले आहे. येथील लोकांची मालमत्ता २.८ टक्क्यांनी कमी होऊन २३ लाख कोटी डॉलर राहिली.

विकसनशील देशात १८% मालमत्ता
विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये मालमत्ता वाढण्याची गती जास्त आहे. तरी एकूण मालमत्तेबाबत हे देश खूप मागे आहेत. जागतिक मालमत्तेच्या फक्त १८ टक्के मालमत्ता विकसनशील देशांकडे आहे. २००० मध्ये हा अाकडा १२ टक्के होता.
३१% आशिया-प्रशांतमध्ये
मोठ्या श्रीमंतांत ३४% चिनी
आशिया प्रशांतमध्ये सध्या ३२,००० आणि युरोपात ३०,००० मोठे श्रीमंत आहेत. येथे २०२१ मध्ये श्रीमंत व्यक्तींची संख्या १७,००० ने वाढून ४९,००० होईल. यामध्ये चीनचे ३९ टक्के लोक असतील. सध्या चिनी मोठ्या श्रीमंतांची संख्या ३४% आहे. मोठ्या श्रीमंत व्यक्ती म्हणजे १० लाख डॉलरपेक्षा जास्त मालमत्ता असणारे व्यक्ती होय.

मालमत्तेत ४.५% वाढ
मालमत्ता ४.५ टक्क्यांनी वाढून ८० लाख कोटी डॉलर झाली. ऑस्ट्रेलियातील रहिवाशांची मालमत्ता ०.२%कमी झाली आहे, तर द. कोरियातील लोकांची मालमत्ता एक टक्क्याने वाढली आहे.
बातम्या आणखी आहेत...