आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक स्तरावर पारदर्शकतेत भारतीय कंपन्यांची आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - पारदर्शकतेच्या बाबतीत भारतीय कंपन्या जगातील १५ विकसित बाजारांमध्ये आघाडीवर आहेत. चीनच्या कंपन्यांचे प्रदर्शन मात्र उत्तम नाही. बर्लिन येथील ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ने यासंदर्भात एक अहवाल जारी केला असून यात ही माहिती देण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणाऱ्या या एजन्सीने १५ देशांत १०० कंपन्यांचा सर्व्हे केला. यात भारतातील सर्व १९ कंपन्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. कंपनीतील एकूण स्थिती आणि पारदर्शकतेसाठी कंपन्यांना हे गुण देण्यात आले आहेत. भारतीय कंपन्यांत १० पैकी ७.३ गुण घेऊन भारती एअरटेल आघाडीवर आहे. दुसरीकडे चीनच्या कंपन्यांचे प्रदर्शन कमी होत आहे. तेथील ३७ कंपन्यांनी सरासरी १० पैकी १.६ गुण घेतले. या कंपन्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी धोरण कमकुवत असल्याने त्यांना कमी गुण मिळाले. जगातील प्रमुख २५ कंपन्यांमध्ये चीनची केवळ जेडटीई ही एकच कंपनी आहे. खालच्या स्तरावरील २५ कंपन्यांत चीनच्या सर्वात जास्त कंपन्या आहेत. सर्व्हेत सामील असणाऱ्या शंभर कंपन्यांमधील ७५ कंपन्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अाफ्रिका) देशातील आहेत. अहवालात म्हटले आहे की, ब्रिक्स देशातील जागतिक जीडीपीत ३० टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे त्यांच्या पारदर्शकतेला समजून घेणे गरजेचे आहे. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ने यापूर्वी २०१३ मध्ये सर्व्हे जारी केला होता. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत १०० कंपन्यांची सरासरी कामगिरी १० गुणांपैकी ३.४ अशी आहे. २०१३ च्या सर्व्हेच्या तुलनेत हे प्रमाण ०.२ टक्के इतके कमी आहे.
पुढे वाचा, आघाडीच्या १० कंपन्यांत भारतातील ९ कंपन्या ..
बातम्या आणखी आहेत...