आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्‍ये पुस्‍तक प्रकाशन कार्यक्रमात दिसले माल्‍या, फोटो व्‍हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाकडून फरार म्‍हणून घोषित विजय माल्या लंडनमधील एका पुस्‍तक प्रकाशन सोहळ्याला उपस्‍थित होते. लोकांमध्‍ये बसलेल्‍या विजय माल्‍याचा फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. यासंदर्भात विविध प्रश्‍न उपस्‍थित झाल्‍यानंतर विदेश मंत्रालयाने ट्वीट करुन प्रकरणाची माहिती दिली, ''जसेही सरनाने उपस्‍थितांमध्‍ये माल्यांना पाहिले, ते कार्यक्रमातून उठून गेले.'' माल्‍या 2 मार्चपासून लंडनमध्‍ये आहेत. त्‍यांच्‍याविरोधात कित्‍येक वारंट जाहीर झाले आहेत. पुस्‍तकाच्या लेखकाचा दावा, कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता..

- हा कार्यक्रम Mantras for Success: India's Greatest CEOs Tell You How to Win या पुस्‍तकाच्‍या प्रकाशनाचा होता. 16 जूनला हा कार्यक्रम झाला.
- सुहेल सेठ या पुस्‍तकाचे लेखक आहेत. जर्नलिस्ट सनी सेन कोरायटर आहे.
- हा कार्यक्रम लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्स येथे ठेवण्‍यात आला होता.
- विदेश मंत्रालयाने याबाबत सफाई दिली व म्‍हटले की, या कार्यक्रमाचे आयोजक इंडियन हाय कमिश्नर नव्‍हते. या कार्यक्रमासाठी नोंदणीची कोणतीही आवश्‍यकता नव्‍हती असे, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सने भारत सरकारला पत्राव्‍दारे कळविले आहे. सोशल मीडियावरुन माहिती घेऊन लोक या कार्यक्रमाला पोहोचले होते.
सुहेल सेठ ट्विट करुन काय म्‍हणाले..
- सुहेल सेठ यांनी ट्विट करुन सांगितले की, हा एक 'ओपन इव्‍हेंट' होता. माल्या कोणत्‍याही निमंत्रणाशिवाय येथे पोहोचले होते. त्‍यांनी हे पण सांगितले की, जसे इंडियन हायकमिश्नर नवतेज सरना यांची माल्‍यावर नजर गेली, ते तेथून निघाले.
माल्‍या फरार घोषित..
बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेल्‍या विजय माल्याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने फरार म्हणून घोषित केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. यापुर्वी माल्याचा पासपोर्ट जप्त केला गेला.
पुढील स्‍लाइड्समध्‍ये पाहा, पुस्‍तक प्रकाशन कार्यक्रमाचे फोटो..