आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 10 श्रीमंत बँका, ज्यापासून होते सरकारची बक्कळ कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्थिक वर्ष संपत आले असतानाच सरकारला एक मोठा धक्का बसला आहे. दरवर्षी सरकारी बँकांकडून सरकारला लाभांशाच्या रुपात एक मोठी रक्कम दिली जाते. हा लाभांश सरकारच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोतही आहे. पण बँकाँची खराब आर्थिक स्थिती पाहता सरकारने चालू आर्थिक वर्ष 2014-15 साठी बँका आणि आर्थिक संस्थांकडून मिळणाऱ्या लाभांशाचे लक्ष्य घटवून 7,400 कोटीवर आणले आहे. हे याच वर्षीच्या बजेटच्या अंदाजाच्या तुलनेत सुमारे 31 टक्क्यांनी कमी आहे. एसबीआयमधून बजेटमध्ये 1,925.13 कोटींचा लाभांश मिळण्याचा अंदाज लावण्यात आला. हे आकडे नव्या आकडेवारीत घटवून 1,312.28 कोटी रुपये करण्यात आले. यावर्षी सरकारला मोठ्या प्रमाणावर लाभांश देणाऱ्या इतर बँकांची स्थिती जाणून घेऊयात.

बाजारातील गुंतवणुकीच्या आकडेवारीचा विचार करता या आहेत देशातील 10 सर्वात मोठ्या बँका...
स्टेट बँक ऑफ इंडिया
बाजारातील गुंतवणुकीतून होणारा नफा आणि विस्ताराचा विचार करता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजारातील एकूण भांडवल सुमारे 200,156.25 कोटी रुपये आहे. तर बँकेच्या एकूण संपत्ती 1,792,234.60 कोटींची आहे. नेट वर्थचा विचार करता हा आकडा 118,282.25 कोटी रुपये आहे.
नोट - सर्व बँकांचे गुंतवणूक 25 मार्चच्या बाजारभावानुसार आहे.

बँकांची नेटवर्थ आणि एकूण संपत्तीचा आकडा 2013 - 2014 या आर्थिक वर्षानुसार आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर बँकांच्या संदर्भातील माहिती...