आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AC तिक‍िट कन्फर्म न झाल्यास SLEEPER मधून करता येईल प्रवास!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी आणखी एक नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ती म्हणजे, AC तिकिट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना SLEEPER मधून प्रवास करता येणार आहे.

उदा. तुम्ही AC-1मध्ये रिझर्व्हेशन केले आहे, परंतु तुमचे तिकिट कन्फर्म झाले नाही. मात्र, त्याऐवजी तुम्हाला AC-2 मधून प्रवास करता येईल. रेल्वे प्रवाशाच्या मागणीनुसार तसेच लोअर श्रेणीतील बर्थ शिल्लक असल्यास TC प्रवाशाला कन्फर्म तिकिट देऊ शकतात. ही व्यवस्था AC-2 आणि 3 च्या प्रवाशांनाही मिळेल. प्रवाशी क्रमश: AC-3 आणि स्लीपर कोचमधून प्रवास करू शकतात. येत्या 15 जुलैपासून या नव्या सुविधेसाठी आरक्षण फॉर्ममध्ये एक कॉलम उपलब्ध करून दिला जाईल. तिकिट रिझर्व्हेशन करताना AC तिकिट कन्फर्म न झाल्यास लोअर श्रेणीतील तिकिट कन्फर्म करण्‍यास काहीच हरकत नसल्याचे प्रवाशाला कॉलममध्ये नमूद करावे लागेल.
भोपाळ रेल्वे डिव्हिजनमधून सुरु होणार्‍या रेवांचल, भोपाळ एक्सप्रेससह देशातील विविध डिव्हिजनमध्ये सुरु होणार्‍या 100 रेल्वे गाड्यांमध्ये 15 जुलैपासून ही सुविधा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, तक्रारीनंतर अवघ्या पंधरा मिनिटांत चकाचक होईल कोच...