आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग १५ व्या महिन्यात निर्यातीत झाली घट, आयातीची स्थितीदेखील खराबच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सलग १५ महिन्यांत भारतीय निर्यातीत घट नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात यात ५.६६ टक्क्यांच्या घसरणीसह २०.७३ अब्ज डॉलरची निर्यात नोंदवण्यात आली. भारत सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार युराेप आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मागणी कमी झाल्यामुळे भारतीय निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. भारतीय निर्यातीच्या दृष्टीने विचार केल्यास हे देश भारतासाठी महत्त्वपू्र्ण बाजारपेठा आहेत.

या अहवालानुसार भारतातील आयातीची स्थितीदेखील खूप चांगली नाही. यामध्ये ५.०३ टक्क्यांच्या घसरणीसह २७.२८ अब्ज डॉलरची आयात नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये "ट्रेड डेफिसिट' जानेवारीमधील ७.६४ अब्ज डॉलरच्या तुलनेत कमी होऊन ६.५४ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे.

कमोडिटीचे दर कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या मागणीमुळे असे झाले आहे. भारतीय वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने ही अाकडेवारी जाहीर करण्यात येते.

सोळा टक्के घसरण
एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान निर्यातीमध्ये १६.७३ टक्क्यांची घसरण झाली आहे. २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये तुलना केल्यास या अकरा महिन्यांच्या काळात निर्यात २८६.३ अब्ज डॉलरवरून कमी होऊन २३८.४ अब्ज डॉलरवर आली आहे. तर एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ च्या दरम्यान निर्यात १४.७४ टक्क्यांनी कमी झाली आहे.

चांदी आयातीत घसरण
ट्रेड डेटा अहवालानुसार फेब्रुवारीमध्ये चांदीच्या आयातीत ५८.३३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१५ च्या १२.१५ कोटी डॉलरच्या तुलनेत यात घट झाली असून ती ५.०६ कोटी डॉलरवर आली आहे.
सोन्याची आयात घटली
आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे फेब्रुवारी महिन्यात सोन्याची आयात २९.४९ टक्क्यांची कमी होऊन १३९.७३ कोटी डॉलरवर आली आहे. डिसेंबर २०१४ नंतरची ही आयात सर्वात नीचांकी पातळीवर आहे. डिसेंबर २०१४ मध्ये १३६.४० कोटी डॉलरचे सोने आयात झाले होते, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये १९८.१६ कोटी डॉलरचे सोने आयात झाले होते. जानेवारी २०१६ मध्ये सोन्याची आयात दरवर्षी ८५.१६ टक्क्यंानी वाढून २९१.१५ कोटी डॉलरवर गेली.
बातम्या आणखी आहेत...