आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ, मात्र निर्यातीला फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ३.१ टक्क्यांनी वाढ झालेली असली तरी निर्यात मात्र निम्म्याने घटली आहे. जागतिक मंदीचा फटका राज्यातील निर्यातीला बसला असून ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे राज्य सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालावरून दिसते.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये खाणकाम, वस्तुनिर्माण आणि विद्युत यांचा समावेश असून या सर्व क्षेत्रांमध्ये चांगली वाढ झाली आहे. उत्पादन निर्देशांकात गेल्या वर्षातील १७२.७ वरून १७८.१ वर म्हणजे जवळपास ३.१ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. २०१४-१५ वर्षातल्या ४,४५,३४९ कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या वर्षात निर्यात घटून ती २,८७,००७ कोटी रुपयांवर आली आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या, तरीही जागतिक मंदीचा मोठा फटका या क्षेत्राला बसला आहे.
आर्थिक पाहणी अहवालात आठ टक्के विकासवाढीचा अंदाज व्यक्त केला असून त्यात मागील वर्षाच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे; परंतु बाजाराची मानसिकता मात्र तशी नाही. जागतिक मंदीचा राज्यातल्या विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...