आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिले Digital Village, कार्डद्वारे दिले जाते दूध- भाजीपाल्याचे पेमेंट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले 'डिजिटल इंडिया'चे स्वप्न आता सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. भारत सरकारच्या 'डिजिटल इंडिया' संकल्पनेंतर्गत गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील आकोदरा हे देशातील पहिले स्मार्ट गव्हर्नन्स गाव ठरले आहे. ICICI बँकेने हे गाव दत्तक घेतले असून येथे या गावाला स्मार्ट गव्हर्नन्सच्या सर्व सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे.

साबरकांठा जिल्ह्यातील हिंमतनगर तालुक्यामध्ये आकोदरा गाव आहे. येथील लोक मोबाइल, कॉम्प्यूटर, इ-बँकिंगचा सहजतेने वापर करत आहेत. दूध- भाजीपाला खरेदीसाठीही लोक डेबिट कार्डचा वापर करताना दिसत आहेत. या गावाला वाय-फाय झोन करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. ICICI बँकेच्या सहकार्याने गावाला इ-गव्हर्नन्स आधारित तंत्रज्ञान पुरवले जात आहे. ICICI बँकेच्या मदतीने लोक गावातील दुध संकलन केंद्रापासून लहान किराणा दुकान आणि भाजीपाला खरेदीसाठी देखील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. अर्थात गावकरी आता कॅशलेस ट्रॅझेंक्शन करताना दिसत आहेत. त्यामुळे गावात नगदी व्यवहार नसल्यातच जमा आहे. सगळीकडे एटीएम कार्डचा उपयोग केला जात आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, सगळे व्यवहार कार्डवद्वारेच...