आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India\'s Most Beautiful Cinema Hall Inox Theater Reliance Mall At Vadodara Gujarat

येथे आरामदायी बेडवर झोपून प्रेक्षक पाहातात सिनेमा, तिकिट दर 800 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलचा ट्रेन्ड इतिहास जमा होऊ पाहात आहे. मल्टीप्लेसमध्ये सिनेमा पाहाण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मल्टीप्लेसकडे लोकांना आकर्षित करण्‍यासाठी थिएटर मालक नव्या युक्त्या शोधून काढताना दिसत आहेत.

जगभरात शानदार थिएटर्स आहेत. काही थिएटर्स आलिशान सुविधांसाठी प्रसिद्ध आहेत. यातील काही थिएटरमध्ये प्रेक्षक बोट किंवा कारमध्ये बसून मुव्हीचा आनंद घेतात. काही थिएटरमध्ये प्रेक्षक बाथ टबमध्ये बसून तर काही ठिकाणी आरामदायक सोफ्या बसून सिनेमा पाहातात. मात्र, या पॅकेजमधून आम्ही आपल्याला गुजरातमधील एका थिएटरविषयी माहिती घेऊन आलो आहे. या थिएटरमध्ये प्रेक्षक आरमदायी बेडवर झोपून ‍सिनेमा पाहाण्याचा आनंद लुटतात.

आइनॉक्स थिएटर, बडोदा
> गुजरातमधील बडोदा येथील रिलायन्स मॉलमधील 'आइनॉक्स थिएटर'मध्ये प्रेक्षकांना आलिशान बेड आहेत. प्रेक्षकांना बेडवर झोपून सिनेमा पाहाण्याची संधी दिली जाते. प्रत्येक बेडवर दोन जण झोपून सिनेमा पाहू शकतात. प्रेक्षकांना प्रति तिकिट 800 रुपये मोजावे लागतात. मीडिया अॅण्ड इंटरटेनमेंट कंपनी आयनॉक्स लेझर लिमिटेड ही कंपनीच्या मालकीचे हे थिएटरचे आहे. 26 जानेवारी 2015 हा मॉल सुरु झाला होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, जगातील प्रसिद्ध व खास मल्टीप्लेक्स थिएटर...