आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीडीपीत ६३.८ % वाढ, पगार मात्र ०.२ % वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक मंदीच्या आठ वर्षांनंतर आतापर्यंत भारताच्या सकल घरेलू उत्पादमध्ये (जीडीपी) ६३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. असे असले तरी भारतीयांचा सरासरी पगार फक्त ०.२ टक्क्यांनी वाढला आहे, तर याचदरम्यान चीनमधील पगार सर्वात जास्त १०.६ टक्क्यांनी वाढले असल्याचा दावा कॉर्न फेरी समूहाच्या विभागाने तयार केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार या आठ वर्षांत वास्तविक पगारवाढीबाबत चीननंतर इंडोनेशिया आणि मेक्सिको सर्वात पुढे आहेत. या देशांमधील पगार अनुक्रमे ९.३ टक्के आणि ८.९ टक्के वाढले आहेत, तर दुसरीकडे इतर काही विकसनशील देशांची स्थिती तर यापेक्षाही खराब आहे. यामध्ये तुर्की, अर्जेंटिना, रशिया आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये नकारात्मक पगारवाढ झाली आहे. या देशात वास्तविक पगारवाढीत अनुक्रमे ३४.४ टक्के, १८.६ टक्के, १७.१ टक्के आणि १५.३ टक्क्यांची घट झाली आहे.

पगारवाढीचा असमतोल
अनेक विकसनशील जी-२० बाजारामध्ये पगारातील वाढीच्या दृष्टीने एक दुसऱ्यापासून विरुद्ध स्थिती असल्याचे अहवालात नमूद करण्यात अाले आहे. काही बाजारांमध्ये पगारात सर्वाधिक वाढ झाली असून काही बाजारांमध्ये पगारात सर्वात कमी वाढ झाली आहे. भारत परिपक्व बाजारांमध्ये असून पगारातील वाढीच्या बाबतीत मध्यम स्थितीत आहे.

कनिष्ठ पातळीवर पगारवाढ नाही
भारतातील पगारवाढीत जास्त असमतोल दिसून आला असल्याचे कोर्न फेरी समूहाचे बेंजामिन फ्रॉस्ट यांनी सांगितले. भारतात कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या पगारात खूपच कमी वाढ झाली असून वरिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पगारवाढ झाली आहे.
सर्वाधिक पगारवाढ देणारे देश : चीन, इंडोनेशिया, मेक्सिको, कॅनडा, भारत
सर्वात कमी पगारवाढ देणारे देश : तुर्की, अर्जेंटिना, रशिया, ब्राझील
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कौशल्यामुळे पगारवाढ
बातम्या आणखी आहेत...