आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे DIAMOND KING, विद्यार्थीदशेत यांनी घेतली होती उंच भरारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः एका कार्यक्रमात गीतांजली समूहाचे चेयरमन मेहुल चोकसी यांच्यासोबत बॉलीवुड अभिनेत्री श्रृद्धा कपूर) - Divya Marathi
(फोटोः एका कार्यक्रमात गीतांजली समूहाचे चेयरमन मेहुल चोकसी यांच्यासोबत बॉलीवुड अभिनेत्री श्रृद्धा कपूर)
सोन्याच्या दागिन्यांनी आपले महत्व टिकवून ठेवले असले तरी बहुतांशी महिला 'डायमंड ज्वेलरी'च्या चाहत्या आहेत. राजा महाराज्यांच्या काळात डायमंडला खूप महत्व होते. राजे महाराजांच्या काळात महाराणींची गळ्यातील हार आणि डोक्यावरील मुकुट हिर्‍यांनी लखलखत असत.

दिवसेंदिवस डायमंड ज्वेलरीची मागणी वाढत आहे. आज प्रत्येक ज्वेलरी शॉपमध्ये डायमंड ज्वेलरी उपलब्ध असते. जगभरातील हिर्‍यांची वाढती मागणी लक्षात घेता दरवर्षी सुमारे 7500 कोटी रुपयांचे हिरे खाणीतून बाहेर काढले जातात.
हिर्‍याच्या व्यवसायाने सुमारे एक कोटी लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील 25 वर्षांत डायमंड ज्वेलरी व्यवसायात तीन पटीने वृद्धी झाली आहे. सध्या वर्षाला 3,90,600 कोटी रुपयांचा कारोभार जगभरात होतो. सन 2018 पर्यंत हा व्यवसाय 500,000 ते 530,000 कोटींच्या घरात पोहोचले, असे मार्केट विशेज्ज्ञांनी म्हटले आहे.

ग्लोबल मार्केटमध्ये भारताचे अग्रस्थानी
हिरे प्रोसेसिंग, कटिंग, पॉलिशिंगसाठी ग्लोबल मार्केटमध्ये (जागतिक बाजार) भारताचे नाव अग्रस्थानी आहे. भारतातील हिरा व्यापारांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर इंडियन डायमंडला ग्लोबल मार्केटमध्ये स्थान मिळवून दिले आहे.

आम्ही या पॅकेजच्या माध्यमातून आपल्याला भारतातील टॉप-6 डायमंड किंग्ज विषयी माहिती देत आहोत. विशेष म्हणजे सर्व डायमंड किंग हे गुजराती आहेत.

1. मेहुल चोकसी
कंपनी: गीतांजली समूह
टनओवर: 7343 कोटी रुपये
मुख्य बिझनेस: चार हजारांहून जास्त सेल्स पॉईंट्स

गीतांजली समूहाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, मेहुल चोकसी यांनी विद्यार्थीदशेत जगातील सगळ्यात मोठा ज्वेलरी व्यापारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. चोकसी यांच्या वडिलांचा डायमंडचा बिझनेस होता. चोकसी यांनी 1975 मध्ये वडिलांचा कारोबार हाती घेतला. 1985 मध्ये चोकसी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी चोकसी यांच्याकडे 50 कोटी रुपयांचे डायमंड होते.
मेहुल चोकसी यांनी कमी वयात रिटेल मार्केटचा अंदाज घेत डायमंड ज्वेलरीचा व्यवसायाचा विस्तार केला. आज मेहुल चोकसी यांच्याकडे गीलीशिवाय माया, संगिनी, नक्षत्र, D'damas,दिया आणि असमी नामाचे ब्रँड आहे.
पुढील स्लाइडचा वाचा, भारतातील इतर डायमंड किंग्जविषयी...