आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India's Wine Production May Reach 21 Mn Litres By 2018

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात वाइन उद्याेग विकासाला सध्या माेठ्या संधी : अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात वाइन उत्पादन अद्याप बाल्यावस्थेत असले तरी ते यंदाच्या वर्षात १८ दशलक्ष लिटर, २०१८ मध्ये २१ दशलक्ष लिटरवर जाण्याची शक्यता आहे. वाइन उद्याेगाने पाच टक्के वार्षिक वाढीची नाेंद केली असल्याचे असाेसिएटेड चेंबर्स आॅफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीजने केलेल्या एका अभ्यास अहवालामध्ये म्हटले आहे.

यंदाच्या वर्षात २० टक्के संकलित वाढीची नाेंद करत वाइनचा खप २२ दशलक्ष िलटर आणि २०१८ मध्ये ३७ दशलक्ष लिटरवर जाण्याचा अंदाज आहे. मागील वर्षात १८ दशलक्ष लिटर वाइन उत्पादन झाले हाेते, असे या अहवालात म्हटले आहे.

वाइन उद्याेग हा अन्य देशांसाठी आकर्षक ठरत आहे. युराेपमधील काही आघाडीच्या वाइन उत्पादकांनी भारतात आपला प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला आहे. याशिवाय तुटवडा भरून काढण्यासाठी यंदाच्या वर्षात वाइनची आयातदेखील वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढती लाेकसंख्या, त्यातूनही मध्यमवर्गीयांचे वाढते प्रमाण, पर्यटनाची आकर्षक स्थळे आणि अन्य काही गाेष्टींमुळे वाइन उद्याेगाच्या वाढीला चालना मिळण्याची शक्यता असल्याचे असाेचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी या अहवालाचे अनावरण करताना सांगितले.

वाइन हे पेय काही ठरावीक वर्गापुरते असून सर्वसामान्यांसाठी ते नाही, असा अजूनही एक गैरसमज समाजात असून त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्याचबराेबर देशातल्या अन्य शहरांमध्येदेखील वाइनला चालना देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
देशातील वाइन ग्राहकांची संख्या या वर्षात केवळ २६.५ दशलक्ष इतकी नाेंदवली गेली आहे. देशातील एकूण १.२५ अब्ज लाेकसंख्येचा तुलनेत हे प्रमाण केवळ २० टक्के आहे.

वाइन उद्याेगाच्या आड येणार्‍या गाेष्टी
- अपुरी साठवणूक आणि शीतकरण सुविधा
- याेग्य वाहतूक सुविधांचा अभाव
- वाइनला चालना देणार्‍या प्राेत्साहनपर गाेष्टींचा अभाव
- विदेशी वाइनच्या तुलनेत जास्त किमती
- स्थानिक वाइन उत्पादनावरील कराचा भार
- विपणनासाठी येणारा भरमसाट खर्च