आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrialist Jaidev Shroff Denies Allegations Of Torture, Extra marital Affair

टीना अंबानींनी जुळून दिले होते या अब्‍जाधीशाचे सूत, आता घेणार घटस्‍फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयदेव आणि पूनम - Divya Marathi
जयदेव आणि पूनम
मुंबई - जयदेव श्रॉफ हे ९ हजार कोटींची उलाढाल असलेल्या युनायटेड फॉस्फरस तसेच अन्य अनेक कंपन्यांचे मालक आहेत. त्यांच्या पूनम नामक दुसऱ्या पत्नीने त्यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, बंगाली बाबाच्या जाळ्यात अडकून पूनम यांनी आपले वशीकरण केले आणि एक विशिष्ट पेय पाजल्यामुळे आपण १२-१२ तासांपर्यंत झोपून राहतो, अशा आशयाची तक्रार जयदेव यांनी पूर्वीच पूनम यांच्याविरोधात नोंदवलेली आहे. पत्नीला घरात प्रवेश देऊ नये, असेही तक्रारीत म्हटले आहे. जयदेव यांचे वडील रजनीकांत ऊर्फ राजूभाई श्रॉफ यांची "जेवेल्स ऑफ इंडिया'मध्ये गणती होते. १९७० मध्ये एक माचिस प्रसिद्ध होती. विमको या स्वीडिश कंपनीने बनवलेल्या या माचिसच्या काडीवर लाल रंगाचे रसायन लावलेले असायचे. हे रसायन रजनीकांत श्रॉफ यांची युनायटेड फॉस्फरस कंपनी बनवायची.
टीना अंबानींनी करून दिली होती ओळख
२००० मध्ये एका पार्टीत जयदेव आणि पूनम भगत यांची भेट झाली. दोघेही पाली हिल परिसरात बालपणापासूनच राहतात. चेहऱ्याने ओळख होती. टीना अंबानी यांनी दोघांना जवळ आणले. २००४ मध्ये दोघांनी लग्न केले. २०१३ पासून दोघांत कुरबूर सुरू आहे. त्यांना एक आठवर्षीय मुलगीही आहे. श्रॉफ यांनी आपल्या आईच्या निरलॉन कंपनीचे पैसे वापरल्याचाही पूनम यांचा आरोप आहे.
श्रॉफ यांनी केवळ चार लाखांत सुरू केला व्‍यवसाय
श्रॉफ यांनी फक्त ४ लाखांत हा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान, विमकोने भारत सरकारकडे तक्रार केली की, ४ कोटी गुंतवल्यानंतर आम्हाला लाल फॉस्फरस बनवता येत आहे. श्रॉफ यांनी इतक्या कमी खर्चात कसे बनवले? त्यावरून सरकारकडून टेक्निकल ट्रेडच्या महासंचालकांनी वापीच्या श्रॉफ यांच्या कारखान्यात जाऊन चौकशी केली. त्यांनी हे सुरक्षित आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. २६ जानेवारीला श्रॉफ यांच्या या रिसर्च अँड डेव्हलपमेंटला राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला. श्रॉफ कुटुंबीयांकडे सध्या जगभरातील ३० कंपन्या असून त्यांचा ७० देशांत व्याप आहे. जयदेव यांची आई ब्रिटिश अाहेत.
कोण होती पहिली पत्‍नी
कॉपरस्मिथ उत्पादने बनवणाऱ्या डीएच एव्हान्स कंपनीच्या मालकाची कन्या सेंडरा यांच्याशी राजूभाई यांची मैत्री झाली. यानंतर त्या सेंडरा श्रॉफ बनल्या. त्यांची आता दोन अपत्ये आहेत. थोरला जयदेव आणि धाकटा विक्रम. जयदेव यांचे पहिले लग्न रोमिला यांच्याशी झाले होते. त्यांची वरुण आणि तान्या (अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहानची मैत्रीण) ही त्यांची अपत्ये आहेत. नंतर रोमिला जयदेवपासून विभक्त झाल्या.
पुढील स्‍लाइड्यवर वाचा, आणखी माहिती आणि पाहा संबंधित फोटोज...