आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळे आणि दुधाचे भावदेखील वाढले, अन्नधान्य स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-मे महिन्यात घाऊक महागाई दर शुन्य ते २.३६ टक्के कमी राहिला. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सतत सातव्या महिन्यात घाऊक महागाई शून्यच्या खाली राहिला. मात्र, गेल्या महिन्यात खाद्य पदार्थांच्या किमती ३.८० टक्के वाढल्या. डाळ, कांदा, फळे, दुधासह बहुतांश वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. घाऊक महागाई दर विशेषकरून पेट्रोल व डिझेलसह इंधन तथा ऊर्जा क्षेत्रात आलेल्या पडझडीमुळे कमी झाला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये घाऊक महागाई २.६५ टक्के आणि गेल्या वर्षी मे महिन्यात ६.१८ टक्के राहिली. किरकोळ महागाई एप्रिलमध्ये ४.८७ टक्के होती ती मे महिन्यात वाढून ५ टक्के झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात घाऊक महागाई मान्सूनवर अवलंबून राहणार आहे. हवामान विभागाने सर्वसाधारणपणे १२ टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
स्वस्त इंधनाचा परिणाम : अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात इंधन आणि ऊर्जेसंबंधी वस्तूंचे भाव १०.५१ टक्के घटले आहेत. या इंधनाच्या किमतीचाही परिणाम महागाईवर झाला आहे.

व्याजदर कमी करण्याची आशा : उद्योग जगताच्या अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने व्याजदारात कमी करणे सुरू ठेवले पाहिजे. या बाबत सीआयआयने व्याजदर कपातीची आशा व्यक्त
केली आहे.
बातम्या आणखी आहेत...