आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation Negative For 17th Month At ( )0.85% In March

भाज्यांच्या महागाईमुळे घाऊक महागाईत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सलग १७ व्या महिन्यातही देशातील घाऊक महागाई दर शून्याच्या खाली नोंदवण्यात आला आहे. असे असले तरी महागाईत वाढ नोंदवण्यात आली आहे. मार्च महिन्यात ठोक महागाई निर्देशांक (डब्ल्यूपीआय) उणे ०.८५ टक्के राहिला. फेब्रुवारीमध्ये तो उणे ०.९१ टक्क्यांवर होता. जानेवारीमध्ये ठोक महागाई दर उणे ०.९ टक्क्यांवरून संशोधनासह उणे १.०७ टक्के नोंदवण्यात आला होता. यादरम्यान खाण्या-पिण्याच्या वस्‍तूंचे भाव वाढले आहेत. तांदूळ, गहू, भाज्या, बटाट्याच्या घाऊक महागाई दरात वाढ झाली आहे.

दर महिन्याच्या आधारावर मार्चमध्ये खाण्या-पिण्याच्या महागाई दरात ३.३५ टक्क्यांच्या वाढीसह ३.७३ टक्के नोंद झाली. तर त्याव्यतिरिक्त वस्तूंची महागाई दर ५.८८ टक्क्यांनी वाढून ८.०९ टक्के नोंदवण्यात आला. मार्चमध्ये मूलभूत किमतीत महागाई दर १.५८ टक्क्यांनी वाढून २.१३ टक्के राहिला. डाळींमधील महागाई दर ३८.८४ टक्क्यांनी कमी होऊन ३४.४५ टक्के नोंदवण्यात आला, तर मार्च महिन्यात भाज्यांचा महागाई दर उणे ३.३४ टक्क्यांच्या तुलनेत उणे २.२६ टक्के नोंदवण्यात आला आहे.

व्याजदर कमी करा
घाऊक महागाई दर गेल्या १७ महिन्यांपासून शून्याच्या खाली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात व्याजदरात आणखी कपातीची अपेक्षा उद्योग जगताने व्यक्त केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदराचा निर्णय घेण्यात येतो. या वेळी बँक किरकोळ महागाई दराचा विचार करते. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर ४.८४ टक्के नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने याच महिन्यात व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे.
कच्चे तेल स्वस्त
मार्च २०१६ मध्ये कच्चे तेल आणि पॉवर क्षेत्रातील घाऊक महागाई दर फेब्रुवारीच्या तुलनेत कमी झाला आहे. मार्चमध्ये तो उणे ८.३० टक्के होता. घाऊक महागाई निर्देशांकात या क्षेत्रातील भागीदारी १४.९१ टक्के आहे.
उत्पादित वस्तू महागल्या
मार्च २०१६ मध्ये उत्पादित वस्तूंमधील घाऊक महागाई दर वाढला असला तरी अद्यापही तो शून्याच्या खालीच आहे. फेब्रुवारीमध्ये उत्पादित वस्तूंचा घाऊक महागाई दर उणे ०.५८ टक्के नांेदवण्यात आला होता. घाऊक महागाई निर्देशांकात उत्पादित वस्तूंची भागीदारी ६४.९७ टक्के आहे.