आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ महागाई चार महिन्यांच्या नीचांकावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजीपाला व फळे तसेच अन्न पदार्थांच्या किमती घसरल्याने एप्रिलमध्ये किरकोळ महागाई चार महिन्यांच्या नीचांकावर आली आहे. हा महागाई दर मार्चमधील ५.२५ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ४.८७ टक्क्यांवर आला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक म्हणून ओळखला जाणारा हा महागाई दर घसरल्याने आता रिझर्व्ह बँकेकडून व्याजकपातीच्या आशा उंचावल्या आहेत.

मार्चमध्ये ६.१४ टक्क्यांवर असलेली अन्नधान्य महागाई एप्रिलमध्ये कमी होऊन ५.११ टक्के झाली आहे. फळांच्या किमती ५.०८ टक्क्यांनी तर भाजीपाल्याच्या किमती ६.६३ टक्के अशा कमी दराने वाढल्या आहेत. तृणधान्ये व त्याच्या उत्पादनाच्या किमती २.१५ टक्क्यांनी, दूध ८.२१ टक्क्यांनी महागले. मांस आणि मासळी सारख्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती ५.५ टक्के तर डाळींच्या किमती १२.५२ टक्क्यांनी वधारल्या.

कर्ज स्वस्ताईच्या आशा पल्लवित
किरकोळ महागाईचा दर पाच टक्क्यांच्या खाली आल्याने तसेच औद्योगिक उत्पादनाचे चक्र मंदावल्याने रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या आशा दुणावल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने व्याजात कपात केली तर गृह, वाहन कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा होईल.
बातम्या आणखी आहेत...