आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये जापानींसाठी सुरु झाले हॉटेल टोकियो, आतून आहे असा नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भारतात दौऱ्यावर आलेले असतांना जापानी पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरच्या साबरमती मैदानात बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे लोकार्पण केले. यादरम्यान, गुजरामध्ये बरेच चित्र बदललेले बघायला मिळाले. इतकेच नव्हे तर अहमदाबादमधील कृष्णलिला हॉटेलमध्ये गुजरातील खाद्य मिळायचे. आता या हॉटेलचे नाव बदलून हॉटेल टोकियो असे झाले असून येथे यापुढे जापानी खाद्यपदार्थ मिळणार आहेत. 
 
- अहमदाबादच्या साणंद परिसरात असलेल्या कृष्णलिला हॉटेलने नाव बदलून टोकियो ठेवले आहे. इतकेच नव्हे तर आता याठिकाणी जापानी मेन्यू मिळतील.
- ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील वाढ लक्षात घेऊन अनेक जापानी लोक अहमदाबादमध्ये राहण्यास येतात. त्यांना जेवण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी हे हॉटेल सुरु करण्यात आली.
- कृष्णलिला हे हॉटेल दोन वर्षापूर्वी सुरु करण्यात आले होते. याठिकाणी ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या हॉटेलमध्ये जापानी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
 
सर्वकाही जापानी
- या हॉटेलचे इंटेरिअर आणि डेकोरेशन जापानी स्टाईलमध्ये करण्यात आले आहे.
- या हॉटेलमधील मेन्यूची भाषाही बदलण्यात आली आहे. त्याशिवाय साईन बोर्ड, होर्डिंग इंग्लिशसह जापानी भाषेत लावण्यात आले आहेत.
- या हॉटेल्सच्या रुममध्ये जापानी चॅनलची व्यवस्थ करण्यात आली आहे.
- यापूर्वी हे हॉटेल पूर्णपणे व्हेज होते. आता हे हॉटेल व्हेजसह नॉनव्हेज झज्ञले आहे. 
- या हॉटेलमध्ये जेवण तयार करणारा शेफ नेपाळहून खास बोलविण्यात आला आहे. तो दहा वर्षापासून जापानी खाद्य तयार करतो. 
 
बातम्या आणखी आहेत...