आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : या वाड्यात अनुभवा राजेशाही थाट, परदेशी पाहुण्यांनाही आहे भुरळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हॉटेल म्हणजे राहणे आणि जेवण्याची सुविधा असलेले ठिकाण. साध्या हॉटेलपासून ते तारांकित हॉटेलनुसार सुविधांमध्ये बदल होत जातात. महाराष्ट्रातील पुणे येथे असेही हेरीटेज होम आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे  हेरीटेज होम म्हणजे एक अद्यावत असा टोलेजंग वाडा. येथे आहे महाद्वार, सातखणी दिवाणखाना, पाचखणी चौक. इतकेच नव्हे तर झिम्मा, फुगडी, मंगळागौरीचे खेळ, लपाछपी, खांबोळी, लंगडी इत्यादी खेळ खेळण्याचीही व्यवस्था. त्यामुळे हे हेरीटेज होम अर्थातच ढेपेवाडा अवघ्या दोन वर्षातच पर्यटकांचे आकर्षक केंद्र होत आहे. मुंबईच्या अगदी सव्वाशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या वाड्यात तुम्ही तुमच्या कुटूंबियांसह अनुभवू शकता गतकाळातील शिवराय, पेशवाईचा थाट अन् अस्सल मराठमोळे राहणीमान.
 
नव्या पिढीला ओळख होण्यासाठी साकारला ढेपेवाडा
शहरांत असणाऱ्या वाड्यांची जागा आता फ्लॅट, अपार्टमेंट, रो हाऊस, बंगलोंनी घेतलेली आहे. तालुके अथवा खेड्यांत वाडे बघायला मिळतात. पण या वाड्यांची दुर्दशा झालेली बघायला मिळते. अगदी 2000 सालानंतर जन्मलेल्यांना वाडा काय आहे, याची साधी माहितीही नाही. आपल्या वाडासंस्कृतीचा परिसस्पर्श नव्याने अनुभवता यावा आणि नव्या पिढीला देखील वाडा संस्कृतीची ओळख व्हावी. या जाणिवेतून ढेपे दांम्पत्यांनी साकारली आहे एक अप्रतिम वास्तू...ढेपे वाडा! ही केवळ वास्तू नव्हे तर पर्यटनासाठी नवं आकर्षणकेंद्रही ठरणार आहे; म्हणून तर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने त्याची विशेष दखल घेतली आहे. पर्यटनासह याठिकाणी वाढदिवस, लग्न, कॉर्पोरेट कंपन्यांच्या मिटींग्स, स्नेहमिलन असे कार्यक्रम. तसेच दिवाळी, दसरा, होळी आणि गुढीपाडव्यासारखे पारंपारिक सणांचेही आयोजन करण्यात येते. 
 
दिवसाकाठी 10 हजार, तर आठवड्यासाठी मोजा 50 हजार
या वाड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे नितीन ढेपे म्हणतात, की या वाड्याला आतापर्यंत हजारो भारतीय, परदेशी पाहुण्यांनी भेटी दिलेल्या आहेत. मराठी पेहराव, खेळ, खाद्य आणि राहणीमान अनुभवण्यासाठी एका कुटूंबाला दिवसाकाठी मोजावे लागतील दहा हजार रुपये. हेच पॅकेज संपूर्ण आठवड्यासाठी 50 हजार रुपयांत मिळते. 
 
अमेरिकन वऱ्हाड, ढेपेवाड्याच्या दारात...
ढेपेवाड्याने नुकतेच दोन वर्षे पूर्ण केली आहेत. यादरम्यान ढेपेवाड्याची ख्याती महाराष्ट्रासह जगभरात पसरली. आतापर्यंत या ढेपेवाड्याला मराठी-हिंदी कलाकार, राजकीयमंडळींनीही भेटी दिल्या आहेत. ढेपे वाड्याच्या वास्तुची भुरळ अमेरिकेच्या अॅलेक्स आणि मधुराच्या कुटुंबीयांना देखील पडली!! मग एप्रिल महिन्यात अमेरिकन वर, तर कोकणी वधूचा भारतीय विधीनुसार लग्नही पार पडले. या लग्नाला महाराष्ट्रीयन कुटूंबियांसह अमेरिकन वऱ्हाडाची उपस्थिती होती. अमेरिकेच्या पाहुण्यांनी आपल्या सर्व परंपरांना मान देत लग्नाचा पुरेपूर आनंद घेतला. 
 
येथे आहे हा अनोखा ढेपेवाडा 
’ढेपे वाडा’ मुळशी तालुक्यातील होतले व डोंगरगाव या गावांमध्ये वसलेल्या ’गिरीवन’ प्रकल्पात आहे. ढेपे वाड्याचे पुण्यातील चांदणी चौकापासूनचे अंतर अंदाजे 36 कि.मी. इतके असून, मुंबई (दादर) पासूनचे अंतर 121 कि.मी. आहे आणि मुंबई गोवा हायवे वरील माणगाव येथून 99 कि.मी. अंतरावर आहे.
 
हे आहेत ढेपेवाड्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये
- पत्ते, काचापाणी, सापशीडी इत्यादी खेळ खेळ्ण्याठी माजघर, सोपा.
- जातं, उखळ, चुल, मांडणी, मोठी ताकाची रवी इत्यादींचा अनुभव घेण्याची व सोबत फोटो काढण्याची सोय.
- आपल्या पारंपारिक झाडांची ओळख व्हावी ह्यासाठी झाडांवर लिहीलेली नावे.
- एप्रिल, मे महिन्यात मिळणारा जांभूळ, करवंद इ. रानमेवा. पक्षी निरीक्षकांसाठी उत्तम जागा.
- रॉक क्लायबिंग, आर्चरी बर्माबीज, रायफल शुटींग, कमांडो रोप, झीपलाईन इत्यादी अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टसाठी गिरीवनमध्ये असलेली ( सशुल्क ) सेवा.
ढेपे वाडा परिसरातील पर्यटन स्थळे
- हाडशीचे सत्यसाईबाबा मंदिर 
- चिन्मय विभुती
- वाळेण व पवना धरण    
- ताम्हिणी घाट
- तुंग व तिकोना व लोहगड किल्ला 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, लक्झरिअस ढेपेवाड्याचे अंतरंग 
बातम्या आणखी आहेत...