आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी बंपर... स्वस्तात खरेदी करा सोने, येथे होतोय लिलाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळी-दसरा हे भारतातील सर्वात मोठे सण अवघ्या महिन्यावर येऊन ठेपले आहेत. सणासुदीच्या काळात सोनेचांदी, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वाहनांमध्ये अब्जावधींची उलाढाल होते. सोने गुंतवणूकीचे साधन असल्याने सोन्याची मागणी या काळात वधारलेली असते. एका फायनान्स कंपनीकडून सोन्याचा लिलाव होत असल्याने दिवाळीपूर्वीच बंपर सोने खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. मण्णपुरम फायनान्स लिमीटेड या कंपनीकडून देशातील तीन राज्यांत गहाण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे. देशातील तीन राज्यातील 74 शाखांतून ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. 
 
मण्णपुरम फायनान्सकडून लिलावात ठेवले जाणारे सोने हे त्यांच्या ग्राहकांनी गहाण ठेवलेले असते. ज्यांनी सोन्यावर कर्ज घेतले, मात्र ते परत केले नाही, त्यांचे सोने लिलावात विक्रीस काढले जाते. या सोन्याचा लिलाव करून कंपनी आपले पैसे रिकव्हर करते. यासंदर्भात कंपनीने अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. 
 
या राज्यात होतोय लिलाव
 
मण्णपुरम फायनान्स लिमीटेडच्या वतीने ही लिलाव प्रक्रिया तीन राज्यातील 74 शाखांच्या माध्यमातून पार पडणार आहे. ही प्रक्रिया 26 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरु होईल. यामध्ये दिल्लीतील 60, उत्तराखंडमधील 5 आणि झारखंडमधील 9 शाखांमध्ये लिलाव होईल. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत नियम व अटी
बातम्या आणखी आहेत...