आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टीव्ह जॉब्सचे भारताशी आहे खास नाते, उत्तराखंडमध्ये सफरचंद खाऊन काढले होते 15 दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीयांना गर्वाची बाब म्हणजे भारताचे आणि स्टीव्ह जॉब्स यांचे भारताशी खास नाते आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी स्वत: मान्य केले आहे की, उत्तराखंडधील मंदिरात जाऊन त्यांच्यात मोठे बदल झाले. 
 
आयफोन एक्स लाँच झाल्यानंतर अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स पुन्हा एकदा चर्चेत आले. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल ट्रेंड सुरु झालाय. विशेष बाब म्हणजे भारतातून ते पुन्हा अमेरिकेत परतल्यानंतर त्यांना अॅपल कंपनीसाठी प्रोत्साहन मिळाले. स्टीव्ह जॉब्स यांचे अॅपल कंपनीच्या नावाचे आणि भारताचेही खास नाते आहे.
 
नीम करोली बाबा यांच्या आश्रमात मिळाले ज्ञान
 
1974 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांना नेहमीच्या पठतील सोडून नवे काही तरी करण्याची इच्छा होती. त्यांच्या मित्रांनी त्यांना भारतात जाण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार जॉब्स भारतात आले. यादरम्यान ते उत्तराखंडमधील नैनीताल येथील नीम करौली येथील कैंची आश्रमात पोहोचले. तेव्हा करौली बाबांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांनी याठिकाणी ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन योगी हे पुस्तक वाचले. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांची विचार करण्याची पद्धतीत आमुलाग्र बदल झाल्याचे त्यांनी जाहिर मान्य केले.
 
भारतात जमिनीवर झोपायचे स्टीव्ह जॉब्स
 
स्टीव्ह जॉब्स यांनी सांगितले, की मी ते क्षण कधीही विसरू शकत नाही. जेव्हा मी शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. भारतात असतांना मित्रांसोबत जमीनीवर झोपायचे. दर रविवारी 11 किलोमीटर पायी चालून जेवणासाठी कृष्णा मंदिरात यायचे. भारतात असलेल्या अध्यात्मात जॉब्स यांना प्रचंड आवड होती.
 
भारतात मिळाले अॅपल नाव
 
भारतातून अमेरिकेत परतल्यानंतर जॉब्स बौद्ध झाले होते. त्यांनी पारंपारिक भारतीय कपडे परिधान करणे सुरु केले होते. त्याशिवाय ते पूर्ण शाकाहारी झाले होते. भारतात असतांना स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या मित्रांसोबत 15 दिवस सफरचंद खाल्ले. याचठिकाणी त्यांना कंपनीसाठी अॅपल हे नाव सुचले.
 
बातम्या आणखी आहेत...