Home »Business »Business Special» At The Age Of 50 They Started Polibhaji Kendra

50व्या वर्षी या महिलांनी 1000 रुपयांत सुरु केले स्वयंपाकघर, आज आहे एक कोटीपेक्षा अधिक उलाढाल

दिव्य मराठी वेब टीम | Oct 06, 2017, 10:21 AM IST

  • स्वयंपाकघर पोळी भाजी केंद्राच्या संचालिका नंदिनी चपळगावकर आणि ज्योती कंवर
औरंगाबाद -कोणतेही चांगले काम करण्यास वय आणि वेळेचे बंधन कधीही नसते. मनाची तयारी, जिद्दल आणि इच्छा शक्ती असेल तर कोणत्याही वयामध्ये व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. घरी नोकरचाकर, पैसाअडका, आलिशान घर आणि गाडी असतांनाही पोळी भाजी सुरु करण्याची मनामध्ये जिद्द होती. वयाच्या 50 व्या वर्षी सुरु केलेला हा पोळीभाजी केंद्रात तयार होणारा दिवाळीचा फराळ परदेशातही जातोय. त्यांनी उभारलेला हा व्यवसाय, त्याची पद्धत शिकण्याकरिता पुण्या-मुंबईहून मॅनेजमेंटचे धडे घेण्यास विद्यार्थी येतात. असे अभिमानाने सांगताहेत महाराष्ट्रातील औरंगाबादमधील स्वयंपाकघर पोळीभाजी केंद्राच्या संचालिका नंदिनी चपळगावकर..
अशी सुचली पोळी भाजी केंद्राची संकल्पना
दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना स्वयंपाकघरच्या संचालिका नंदिनी चपळगावकर म्हणाल्या की, साधारणत: 1997च्या आसपास आम्ही औरंगाबादहून कोल्हापूरला कारने जात होतो. भुक लागली म्हणून आम्ही पुण्याला जेवणासाठी थांबायचे ठरविले. एका जिन्याखाली एक वयोवृद्ध आम्हाला पोळीभाजी केंद्र चालवितांना दिसला. आम्ही त्याच्याकडून पोळी, भाजी, भात आणि वरण असे पार्सल घेतले. तेव्हाच औरंगाबादसारख्या ठिकाणी असे पोळी भाजी केंद्र सुरु करण्याची कल्पना सुचली.
पुढील स्लाईडवर वाचा - परदेशात आहे फराळाची मागणी

Next Article

Recommended