आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Brother And Sister From Mumbai Playing Cricket And Atheletics Athletics In Dubai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महेंद्रसिंह धोनीसह अनेक दिग्गज आहेत या 13 वर्षाच्या क्रिकेटरचे फॅन, बहिणही आहे अॅथलेटिक्स खेळाडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंह धोनीसह आर्णव कांबळी - Divya Marathi
महेंद्रसिंह धोनीसह आर्णव कांबळी
औरंगाबाद - मूर्ती लहान पण कीर्ती महान... ही म्हण मूळ मुंबईच्या सध्या वास्तवास दुबईत असणाऱ्या 13 वर्षाच्या क्रिकेटरला तंतोतंत लागू पडते. या छोट्याशा क्रिकेटरने वयाच्या चौथ्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. अवघ्या नऊ वर्षाच्या कालावधीत त्याने शतक आणि अर्धशतक आपल्या नावावर केले आहेत. त्याच्या बहारदार बॅटींगचे खुद्द क्रिकेटमधील दिग्गज सुनिल गावस्कर या क्रिकेटरचे फॅन आहेत. इतकेच नव्हे तर भारताचे सुनिल गावस्कर, सुरेश रैना, पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी, सरफराज अहमद, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ या खेळाडूंनीही त्याचे टॅलेंटचे कौतुक केले आहे. काहींना त्याच्यात सचिन तेंडुलकरही दिसतो. इतकेच नव्हे तर त्याची 16 वर्षाची बहिणसुद्धा आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धामध्ये पदकांची कमाई करतेय. होय, आपण बोलतोय आर्णव आणि तनिष्का कांबळी या दोन भावंडाबद्दल...
 
प्रिती कांबळी दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना म्हणाल्या की, माझे पती हेमंत आणि मी मूळ मुंबईच्या बांद्रा येथील रहिवासी. कामानिमीत्त आम्ही दुबईमध्ये 2006 मध्ये स्थायिक झालो. आम्हा दोघांनाही क्रिकेटची आवड होती. मी स्वत: मुंबईच्या शिवाजीपार्क जिमखाना आणि मुंबई क्रिकेट टीमकडून खेळलेली आहे. हेमंत कांबळी हे ओमनच्या नॅशनल टीमकडून खेळलेले आहे. करिअरमुळे आम्हाला क्रिकेट सोडावे लागले. तरीही खेळाचे वातावरण घरामध्ये होते. दोघेही मुले लहान असतांना त्यांच्यातील खेळाचे कसब ओळखले. त्यानंतर आर्णव क्रिकेट, तर तनिष्का अॅथलेटिक्स खेळतेय. दुबईमधील प्रत्येक आंतरशालेय स्पर्धा दोघांनीही गाजवल्या आहेत. पुढे त्यांचे ध्येय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे आहे. 
बातम्या आणखी आहेत...