आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने घरगुती सुरु केला कपड्यांचा व्यवसाय, आज होतेय 300 कोटींची उलाढाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 300 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या व्यवसायाचे मालक शरद सुरी, ज्यांची आई घरगुती कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करत होती. आपल्या आईकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे आणि काहीतरी करून दाखविण्याची धमक असल्याने शर सुरींनी आज 300 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला. आज सीएनएम अॅपरेल आणि फॅशन ब्रँडची चलती आहे.
 
घरातून 5 हजार रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु केला बिझनेस
चुनमुनचे संचालक शरद सुरी यांनी सांगितले की, ऐंशीच्या दशकात त्यांची आईने या व्यवसायाला सुरुवात केली होती. तीन मुलांसह कुटूंब चालविण्यासाठी कपडे विक्रीचा व्यवसाय आईने याकडे लक्ष दिले होते. त्यावेळी ठोक बाजारातून कपडे खरेदी करून ग्राहकांना रिटेलमध्ये विक्री करत असायची. दिल्लीच्या लाजपतनगरमध्ये या व्यवसायाने उंच उडी घेतली. त्यांच्या घरातील एक रुम कपड्यांसाठी राखिव ठेवण्यात आली. 
 
मुलांनी वाढवला व्यवसाय
सायन्समध्ये पदवी घेतलेल्या शरद सुरी यांनी एअर इंडियाच्या नोकरीवर पाणी सोडून आईच्या व्यवसायात वाहून घेतले. त्यांनी 1985 मध्ये या घरगुती व्यवसायात अधिक लक्ष देण्यास सुरवात केली. त्यांनी ग्रेटर कैलाशमध्ये 1989मध्ये एक स्वतंत्र स्टोअर सुरु केले. त्यांनतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
 
पुढील स्लाईडवर वाचा - 300 कोटींची भरारी
बातम्या आणखी आहेत...