आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांना फक्त Googleवर भरोसा, दुसऱ्या क्रमांकावर Amazon

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीयांना कोणावर भरोसा असो वा नसो. मात्र, Googleवर भारतीयांना पूर्णपणे भरोसा असून Amazon दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुगलनंतर भारतीय ज्या ब्रँडवर विश्वास ठेवतो त्यात मायक्रोसॉफ्टचाही नंबर लागतो. त्यानंतर अॅमेझॉन, मारुती सुझुकी आणि अॅपलचा क्रमांक लागतो. Cohn & Wolfe कंपनीच्या सर्वेक्षणानुसार विश्वसनीय टॉप 10 ब्रँडमध्ये सोनी, यू ट्यूब, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि ब्रिटीश एअरवेजचाही समावेश आहे.
 
67 टक्के भारतीयांना ब्रँडची भुरळ
सर्वेक्षणादरम्यान निष्कर्ष असे सांगतो की, भारतीय ग्राहक ब्रँडच्या बाबतीत अधिक विचार करतात. यावर्षी जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार 67 टक्के भारतीय ग्राहक खरेदी करण्यापूर्वी ब्रँडचा विचार करतात. ब्रँडमुळे त्यांना चांगले उत्पादन मिळेल, अशी त्यांना अपेक्षा असते.
 
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 38 टक्के ग्राहकांचे म्हणणे आहे की, ब्रँड अधिक प्रामाणिक असून ते उत्पादनाची जबाबदारीही घेतात. जागतिक पातळीवर ब्रँडवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या फक्त 25 टक्के इतकी आहे. कॉन अँड वोल्फने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले की, अॅपलखालोखाल अॅमेझॉन ब्रँडच्या विश्वसनीयतेच्या बाबतीत जगात प्रसिद्ध आहेत.
 
रिपोर्टनुसार, जागतिक प्रामाणिकता निर्देशांकात क्रमश: तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि पे पालचा क्रमांक आहे. या सर्व कंपन्या टेक्नॉलॉजीशी सलंग्नित आहेत. या निष्कर्षानुसार भारतात 67 टक्के ग्राहक ब्रँडेड वस्तू खरेदी करण्यात अधिक विश्वास ठेवतात.
 
कंपनीचे अध्यक्ष मॅट स्टॅफोर्ड यांनी संागितले की, जे ब्रँड आपल्या ग्राहकांसोबत चांगले व्यवहार करून चांगले बोलातत त्यांच्यावर ग्राहक अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे भारतात ब्रँड निर्माण करायचा असल्यास विश्वसनीयता, ग्राहकांचा सन्मान आणि वास्तविकतेवर अधिक जोर द्यावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...