आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याकाठी 2 लाख रुपये कमावण्याची संधी, हिमालया देत आहे मोफत फ्रँचायजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही स्वत:चा बिझनेस सुरु करण्याच्या विचारात असाल, तर ही संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. हिमालया इंटरनॅशनल कंपनी तुम्हाला मोफत फ्रँचायजी देईल. या फ्रँचायजीच्या माध्यमातून तुम्ही तब्बल 2 लाख रुपये महिन्याला सहज कमवू शकता. यासाठी कंपनीने एक्स्क्लुजिव्ह क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट आणि स्टोअर सुरु करण्यासाठी ऑफर दिली आहे. याद्वारे तुम्ही डबाबंद जेवण तुम्ही विकू शकता. यावर रिटेलर्सला 25 टक्के मार्जिन मिळणार आहे. 
 
याव्यतरिक्त पहिल्यावर्षी कंपनीतर्फे तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त मार्जिन दिले जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे प्रोडक्ट तुम्ही जागेवरच खाऊ शकता अथवा पॅक करून घरी घेऊन जाऊ शकता. मेन्यूमध्ये समावेश असलेल्या उत्पादनांवर सरासरी 50 टक्के मार्जिन मिळणार आहे. 
 
पहिल्याच वर्षी करा 24 लाख रुपयांची कमाई
या मॉडेल अंतर्गत 3.5 लाख रुपयांच्या सेलवर तुम्हाला ब्रेक इव्हन पाँईंटवर पोहचाल. तब्बल 8 महिन्यात गुंतवणूक केलेला पैसा तुम्हाला परत मिळेल. कंपनीच्या अंदाजानुसार, 20 टक्के विक्रीत वाढ झाल्यास 20 टक्के अतिरिक्त नफाही मिळेल. 
कंपनीच्या आकडेवारीनुसार, पहिल्या वर्षी किमान 24 लाख रुपये कमाई होऊ शकते. या फ्रँचायजीला कंपनीच्या 50 स्टॉक किपींग युनिटचा अॅक्सेस मिळेल. त्यामुळे कधीही केव्हाही रेडी टू ईट स्नॅक्स मसाला फ्राईज, प्रीमियम आईस्क्रीम, मशरूम आणि व्हेजिटेबल सूपचा पुरवठा करू शकता. 
 
बातम्या आणखी आहेत...