आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्कम टॅक्स विभागाला ऑनलाईन विचारा प्रश्न, चॅटवर एक्स्पर्ट टीमकडून मिळेल लगेचच उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्कम टॅक्स विभागाबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असल्यास तुम्हाला ऑनलाईन विचारण्याची सोय करण्यात आलेली आहे. या प्रश्नांची उत्तरे विभागाकडून आता ऑनलाईन मिळणार आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ऑनलाईन चॅट सर्व्हिस सुरु केली आहे. इन्कम टॅक्स विभागाने www.incometaxindia.gov.in/ या वेबसाईटवर क्वेरी विंडो सुरु केली.
 
एक्सपर्ट टीम देईल उत्तर
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एक्सपर्ट आणि टॅक्स प्रॅक्टीशनर्सची टीम ऑनलाईन उत्तर देण्यासाठी सज्ज असेल. ही टीम टॅक्सपेअरच्या सर्वसामान्य प्रश्नांना उत्तरे देणार आहे. विभागला मिळणाऱ्या फीडबॅकनुसार ऑनलाईन चॅट सिस्टीम आणखी अपडेट केली जाईल.
 
चॅट सुरु करण्यासाठी द्यावा लागेल मेल आयडी
चॅट सुरु करतांना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी देणे अनिवार्य राहणार आहे. तुमच्या संदर्भासाठी ही चॅट तुम्ही मेलवर मागवूही शकता. चॅटच्या सुरुवातीलाच सांगण्यात येईल की, हा सल्ला एक्सपर्ट यांच्या मतांवर आधारित आहे. ही चॅट इन्कम टॅक्स विभागाची अधिकृत मानली जाणार नाही. 
 
इन्कम टॅक्सच्या नियमांची घेऊ शकता माहिती
या चॅट सर्व्हिसच्या माध्यमातून इन्कम टॅक्सच्या नियमांबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर इन्कम टॅक्स चुकविल्यास तुमच्या विरोधात काय कारवाई होऊ शकते, याचीही माहिती दिली जाईल.
 
टॅक्सपेअरची संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट
इन्कम टॅक्स विभागाचे यामागे उद्देश आहे की, करदात्यांची संख्या वाढविणे. चालू आर्थिक वर्षात एक कोटी 20 लाख नवे टॅक्सपेअर उभारण्याचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...